दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आझमने अव्वल स्थान कायम राखले. यासह त्याने विराट कोहलीचा सर्वाधिक दिवस टी-२० मध्ये अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम मोडला. कोहली मागच्या दशकात १,०१३ दिवस अव्वल राहिला होता. आझमने १,०१४ दिवस अव्वल राहत कोहलीचा विक्रम मोडला.
भारताच्या इशान किशनला दोन स्थानांचे नुकसान झाले. आयर्लंडविरुद्ध दमदार कामगिरी केलेल्या दीपक हुडा व संजू सॅमसन यांनी मोठी झेप घेतली. किशन सातव्या स्थानी घसरला असून, हुडाने तब्बल ४१४ स्थानांची झेप घेत १०४ क्रमांक मिळवला. सॅमसनही १४४व्या स्थानी पोहचला आहे. गोलंदाजांमध्ये हर्षल पटेल ३३व्या स्थानी पोहचला. १४व्या स्थानावरील भुवनेश्वर कुमार अव्वल भारतीय ठरला.
टीम इंडियाचे अव्वल स्थान कायम -
सांघिक क्रमवारीमध्ये भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका २-० अशी जिंकलेल्या भारताचे सर्वाधिक २६८ गुण झाले आहेत. भारतानंतर इंग्लंड (२६५), पाकिस्तान (२६१), दक्षिण आफ्रिका (२५६) आणि ऑस्ट्रेलिया (२५०) यांचा क्रमांक आहे.
Web Title: Babar Azam breaks Virat Kohli's record, remains highest in T20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.