Join us  

Babar Azam Virat Kohli, ENG vs PAK: बाबर आझमचा अनोखा विक्रम, विराट आता करू शकणार नाही त्याची बरोबरी

बाबरने नक्की असा कोणता विक्रम केलाय पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 9:50 PM

Open in App

Babar Azam Virat Kohli, ENG vs PAK: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम एकामागून एक विक्रम करत आहे. आता त्याने आणखी एक पराक्रम केला आहे. एक कर्णधार म्हणून बाबर आझम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक अर्धशतके करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने जगातील महान क्रिकेटपटू आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली असून तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या बाबतीत टीम इंडियाचे 'रनमशीन' म्हटला जाणारा विराट कोहलीही बाबर आझमच्या मागे आहे.

बाबर आझमची पॉन्टींगच्या विक्रमाशी बरोबरी

बाबर आझमने या विक्रमाची बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबरने २०२२ मध्ये २४ अर्धशतके ठोकली आहेत. मात्र, बाबरला अजूनही पॉन्टिंगला मागे टाकण्याची संधी आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका या महिन्यात २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. बाबर आझमने रिकी पाँटिंगच्या १७ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली. २००५ मध्ये, रिकी पाँटिंगने एका वर्षात २४ अर्धशतके झळकावली होती. ती एका कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक अर्धशतकांची संख्या आहे.

आता विराटकडे संधी नाही...

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत रिकी पाँटिंग आणि बाबर आझम याच्यानंतर मिसबाह-उल-हकचा क्रमांक लागतो. मिस्बाहने २०१३ साली २२ अर्धशतके झळकावली होती. त्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नाव येते. विराट कोहलीने २०१७ आणि २०१९ मध्ये २१-२१ वेळा अर्धशतके झळकावली आहेत. पण आता विराट कोहलीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला असल्याने तो बाबर आझमचा हा विक्रम मोडणे शक्य नाही.

टॅग्स :बाबर आजमविराट कोहलीपाकिस्तान
Open in App