Babar Azam, Asia Cup 2022 PAK vs AFG: पाकिस्तान विरूद्धच्या सुपर-४ च्या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी २० षटकांत केवळ १२९ धावा करत पाकिस्तानला माफक १३० धावांचे आव्हान दिले. अफगाणिस्तानच्या संघाकडून फलंदाजांनी चांगली सुरूवात मिळवून दिली होती, पण पाकिस्तानी गोलंदाजांनी त्यांना बांधून ठेवलं. त्यामुळे एकाही अफगाणिस्तानच्या फलंदाजाला चाळीशी गाठता आली नाही. इब्राहिम झाद्रानने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तर पाकिस्तानच्या नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनी अप्रतिम भेदक मारा केला. पाकिस्तानच्या संघाने १३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग सुरू केल्यानंतर पहिल्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने १ धाव काढली. त्यानंतर दुसरा चेंडू कर्णधार बाबर आझमने खेळला. फजलहक फरूकी याने टाकलेला चेंडू बाबर आझमला नीट खेळताच आला नाही. चेंडू थेट जाऊन त्याच्या पायावर आपटला आणि स्टंपच्या रेषेत त्याचा पाय असल्याने तो पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला.
बाबर आझम शून्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांना भन्नाट मीम्स पोस्ट केले. काही लोकांनी त्याला सबुरीने खेळण्याचा आणि न खचण्याचा सल्ला दिला. तर काही चाहत्यांनी थेट, कोहलीसोबत बाबर हात मिळवतानाचा फोटो पोस्ट करत त्याची फिरकी घेतली. याशिवाय, एका चाहत्याने धमाल चित्रपटातील फोटो मीम पोस्ट करत, 'तुला भेटल्यापासून माझी दहशतच संपत चाललीय', असं मजेशीर मीम पोस्ट केलं. तर एका चाहत्याने मिर्झापूर वेब सिरीजचा डायलॉग आणि फोटो पोस्ट करत, बाबरकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असल्याचे म्हटले. पाहूया त्यापैकी काही भन्नाट मीम्स...
--
--
--
--
--
पाकिस्तानच्या संघाने गेल्या सामन्यात भारताला पराभूत केले होते, त्यामुळे त्यांनी संघात बदल केला नाही. पण अफगाणिस्तानने मात्र दोन महत्त्वाचे बदल केले. अजमतुल्ला उमरझाई आणि फरीद अहमद या दोन खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. हे दोन गोलंदाज आज पाकिस्तानी फलंदाजांना रोखू शकतात का, याकडे अफगाणिस्तानच्याच नव्हे, तर भारतीय चाहत्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.
अफगाणिस्तानचा संघ- हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, राशिद खान, अजमतुल्ला उमरझाई, फरीद अहमद, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारुकी
पाकिस्तानचा संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ, मोहम्मद हसनैन