ICC Awards 2021 : आयसीच्या २०२१च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचं वर्चस्व दिसत आहे. मोहम्मद रिझवाननं ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावल्यानंतर आज पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) हा वन डे तील सर्वोत्तम खेळाडू ठरला. आयसीसीनं या पुरस्कारासाठी शाकिब अल हसन, येनमन मलान, पॉल स्टिर्लिंग व बाबर या चौघांना नामांकनं दिली होती. पण, बाबरनं बाजी मारली. मात्र जे विराट कोहलीला जमलं ते बाबरला करता आलेलं नाही.
वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या बाबरनं २०२१मध्ये ६ वन डे सामन्यांत ४०५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिक दौऱ्यावर त्यानं सर्वाधिक २२८ धावा करून मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. पाकिस्ताननं ती मालिका २-१ अशी जिंकली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो एकट्यानं लढला होता. तीन सामन्यांत त्यानं सर्वाधिका १७७ धावा केल्या होत्या, पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला १००+ धावा करता आल्या नव्हत्या.
कमी वयात आयसीसी पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये बाबर पाचव्या क्रमांकावर आहे. तो २७ वर्षांचा आहे ( Youngest to win ICC cricketer of the year award) विराट कोहली व क्विंटन डी कॉक यांनी २४ व्या वर्षी, केव्हिन पीटरसननं २५व्या आणि महेंद्रसिंग धोनीनं २७व्या वर्षी आयसीसीचा पुरस्कार जिंकला होता.
Web Title: Babar Azam has been named as ICC ODI Cricketer Of The Year 2021, he is a fifth Youngest to win ICC cricketer of the year award
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.