इम्रान यांच्यावरील हल्ल्याचा बाबर आझमकडून निषेध; पाकिस्तानला सुरक्षित ठेवण्याची दुवा! 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बाबर आझमने निषेध केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 07:43 PM2022-11-03T19:43:10+5:302022-11-03T19:44:51+5:30

whatsapp join usJoin us
Babar Azam has condemned the attack on Pakistan's former Prime Minister Imran Khan  | इम्रान यांच्यावरील हल्ल्याचा बाबर आझमकडून निषेध; पाकिस्तानला सुरक्षित ठेवण्याची दुवा! 

इम्रान यांच्यावरील हल्ल्याचा बाबर आझमकडून निषेध; पाकिस्तानला सुरक्षित ठेवण्याची दुवा! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात माजी पंतप्रधान इम्रान खान देखील जखमी झाल्याची माहिती पाकिस्तानच्या एआरवाय वृत्तसंस्थेने दिली आहे. इम्रान खान यांच्यासोबतच आणखी चार व्यक्ती गोळीबारात जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. आता पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 

बाबर आझमने केला निषेध 
बाबर आझमने ट्विटच्या माध्यमातून इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. "इम्रान खान यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. अल्लाह कप्तानला सुरक्षित ठेवो आणि आमच्या प्रिय पाकिस्तानचे रक्षण करो." बाबर आझमशिवाय इतरही पाकिस्तानी खेळाडू या घटेनचा निषेध करत आहेत. 

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने हल्ल्याची कबुली दिली आहे. त्याला हल्ला करताना पकडण्यात आले होते. तसेच मारेकऱ्याने इम्रान खान यांच्यावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. खरं तर सर्वप्रथम हल्ला करणाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले होते, मात्र आता त्याची प्रकृती ठीक आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून इम्रान खान यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान यांनी सध्या पाकिस्तानात 'आझादी मोर्चा' काढला आहे. सरकार विरोधी लढ्यात ते रस्त्यावर उतरले आहेत आणि निदर्शने करत आहेत. 

इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला
ज्या दिवसापासून इम्रान खान तोशखाना प्रकरणात दोषी ठरवले गेले आहेत. तेव्हापासूनच त्यांनी आझादी मोर्चाला सुरुवात केली आहे. याच अंतर्गत गुरुवारी वजिराबाद येथे मोर्चाचे आयोजन केले गेले होते. यात स्वत: इम्रान खान देखील सहभागी झाले होते. वजिराबाद येथे रॅली सुरू असतानाच गोळीबार झाला आहे. इम्रान खान यांच्या कंटेनरजवळ वजीराबाद येथील जफर अली खान चौकाजवळ गोळीबार झाल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. इम्रान खान यांच्यासोबतच माजी राज्यपाल इमरान इस्मेल देखील जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हल्लेखोराने सांगितलं कारण 

 

 

Web Title: Babar Azam has condemned the attack on Pakistan's former Prime Minister Imran Khan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.