नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा थरार रंगला असून आज या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. सलामीचा सामना जिंकून यजमान पाकिस्ताननं विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्ताननं नेपाळचा दारूण पराभव केला. आज पाकिस्तानसमोर भारताचे तडगे आव्हान असणार आहे. या बहुचर्चित सामन्यासाठी पाकिस्ताननं आपला संघ जाहीर केला असून नेपाळला धूळ चारणारा संघ भारताविरूद्ध मैदानात असणार आहे.
पहिला सामना पाकिस्तानात खेळल्यानंतर यजमान संघ भारताविरूद्धच्या सामन्यासाठी श्रीलंकेला गेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तानच्या संयुक्त यजमानात ही स्पर्धा खेळवली जात आहे.
भारताविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन)
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल