बाबर आजमनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीला दिला दुसरा धक्का; टीम इंडियाची वाढवली चिंता

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी या शॉर्टेस्ट फॉरमॅटमध्ये आणखी एक पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 10:13 PM2021-10-03T22:13:43+5:302021-10-03T22:26:48+5:30

whatsapp join usJoin us
Babar Azam notches up a new record Crown; he is the fastest ever to 7000 T20 runs, having surpassed Virat Kohli   | बाबर आजमनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीला दिला दुसरा धक्का; टीम इंडियाची वाढवली चिंता

बाबर आजमनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीला दिला दुसरा धक्का; टीम इंडियाची वाढवली चिंता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी या शॉर्टेस्ट फॉरमॅटमध्ये आणखी एक पराक्रम केला. मागील आठवड्यात त्यानं नॅशनल ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये खणखणीत शतक मारून विक्रमाची नोंद केली. आजमचे हे ट्वेंटी-२०तील सहावे शतक आहे आणि पाकिस्तानकडून सर्वाधिक ट्वेंटी-२० शतकांचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. त्यानं रोहित शर्मा व शेन वॉटसन यांच्या विक्रमाची बरोबरी केली, तर विराट कोहलीला ( ५) मागे टाकले. २०१९पासून एकाही फलंदाजाला ट्वेंटी-२०त ४ शतकं झळकावता आलेली नाहीत, परंतु आजमनं हा पराक्रम केला. त्यानंतर आता बाबरनं आणखी एक विक्रम करताना विराटला मागे टाकले.

नॅशनल ट्वेंटी-२० लीगमध्ये बाबरनं सेंट्रल पंजाब ( पाकिस्तान) संघाचे नेतृत्व करताना हा विक्रम केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा करणारा तो जगातला अव्वल फलंदाज ठरला.  बाबरनं १८७ डावांमध्ये ट्वेंटी-२०त ७००० धावा पूर्ण केल्या. त्यानं ख्रिस गेलचा ( १९२ डाव) विक्रम मोडला. विराटला हा पल्ला ओलांडण्यासाठी २१२ डाव खेळावे लागले. अॅरोन फिंच ( २२२) व डेव्हिड वॉर्नर ( २२३) हे टॉप फाईव्हमध्ये आहेत. ट्वेंटी-20 वर्ल्लड कपपूर्वी बाबरचा हा फॉर्म टीम इंडियाची चिंता वाढवणारा नक्की असेल. 


पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन,  शाहिन शाह आफ्रिदी

जाणून घ्या पाकिस्तानचे वेळापत्रक

२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
२६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
२९ ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
२ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी ७.३० वाजता
७ नोव्हेंबर -  पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
 

Web Title: Babar Azam notches up a new record Crown; he is the fastest ever to 7000 T20 runs, having surpassed Virat Kohli  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.