Join us  

"बाबर आझम जगातील नंबर १ फलंदाज, पण विराट कोहली..."; श्रीलंकन दिग्गजाचं मत

बाबरच्या खेळाचं कौतुक करताना श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू विराटबद्दलही भरभरून बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 11:42 AM

Open in App

Virat Kohli vs Babar Azam: सध्या जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची तुलना बाबर आझमशी केली जाते. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू या दोघांबद्दल आपापले मत मांडत असतात. या दोघांबद्दल बोलत असताना श्रीलंकन क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वासनेही आपले मत व्यक्त केले. त्याने सांगितले की, बाबर आझम हा सध्या जगातील नंबर वन फलंदाज आहे. यासोबतच त्याने विराट कोहलीबद्दलही महत्त्वाचे विधान केले. तसेच, भारतीय क्रिकेटवरही त्याने आपले मोलाचे मत मांडले.

बाबर आझम नंबर वन फलंदाज

 बाबर आझम सध्या श्रीलंकेतील लंका प्रीमियर लीगमध्ये कोलंबो स्ट्रायकर्स संघाकडून खेळत आहे. बाबर आझमबद्दल एचटीशी बोलताना चमिंडा वास म्हणाला, "बाबर आझम हा जगातील नंबर वन फलंदाज आहे. तो ज्या प्रकारे खेळत असतो आणि जो संघासाठी जे योगदान देतो, ती बाब खरंच आश्चर्यकारक आहे. आपण सगळेच त्याची कामगिरी पाहतो आणि त्याचे कौतुकही करतो. युवा क्रिकेटपटूंसाठी हा शिकण्याचा मुद्दा आहे. त्याला लंका प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. बाबर व्यतिरिक्त नसीम शाह देखील एक दर्जेदार खेळाडू आणि गोलंदाज आहे. नसीमची पाथीरानासोबत गोलंदाजी पार्टनरशिप करणे या दोघांसाठी खास असेल."

विराट आणि सचिनबद्दल काय म्हणाला?

कोहलीने नुकताच आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. आणि या सामन्यात त्याने आपले 76 वे शतक झळकावले. सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम विराट कोहली मोडू शकतो का? असे विचारले. त्यावर वास म्हणाला, "विक्रम मोडण्यासाठीच बनतात. वेगवेगळ्या खेळाडूंनी वेगवेगळ्या वेळी अनेक विक्रम मोडले आहेत. विराट कोहलीची खास गोष्ट म्हणजे तो अजूनही तरुण दिसतो आणि वय हे त्याच्यासाठी केवळ एक आकड्यासारखे आहे. त्याचा फिटनेस ही त्याची जमेची बाजू आहे. सध्या कोहली ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यावरून तो खूप काही साध्य करेल असे स्पष्टपणे दिसते."

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीबाबर आजमश्रीलंकासचिन तेंडुलकर
Open in App