नवी दिल्ली : पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र आता चर्चेत येण्यामागील कारण थोडं वेगळे आहे. कर्णधार बाबर आझमची इंग्रजी (English) भाषेवरील पकड कमकुवत आहे. पाकिस्तानचे अनेक कर्णधार यावरून ट्रोल झाले आहेत. दरम्यान, बाबर आझमला देखील याचा सामना करावा लागत आहे. याचे एक छोटेसे उदाहरणही नुकतेच पाहायला मिळाले. सध्या नेदरलॅंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या संघाने यजमान संघाना चितपट केले. १८ ऑगस्ट रोजी हेजलरवेग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने ७ बळी राखून मोठा विजय मिळवला. या सामन्यात बाबर आझमने देखील शानदार अर्धशतकी खेळी करून यजमान संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला.
बाबर आझम इंग्लिशमुळे ट्रोल
सामना संपल्यानंतर अवॉर्ड वितरणावेळी बाबरला काही प्रश्न विचारण्यात आले. इंग्लिशमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना बाबरची गडबड झाली आणि त्यावरून त्याला ट्रोल केले जात आहे. बाबरच्या इंग्रजी भाषेवरील कमकुवत आकलनामुळे चाहत्यांना खिल्ली उडवण्याची संधीच मिळाली आहे. "बाबरपेक्षा सरफराज बरा होता की", अशा शब्दांत चाहते पाकिस्तानी संघावर निशाणा साधत आहेत.
लक्षणीय बाब म्हणजे बाबर आझम पहिलाच पाकिस्तानी खेळाडू नाही ज्याला इंग्लिशवरून ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक, सरफराज अहमद यांसारख्या खेळाडूंनाही या समस्येचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता सोशल मीडियावर पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली जात आहे. मात्र, काही भारतीय चाहत्यांसह जगभरातील क्रिकेटप्रेमी बाबरच्या मदतीला धावून आले आहेत आणि त्याला पाठिंबा देत आहेत.
Web Title: Babar Azam once again trolled for bad English, Memes are going viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.