Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केलं. आझमनं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून वनडे क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान काबिज केलं आहे. बाबर आझम नंबर एकचा फलंदाज झाल्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट विश्वात आनंद व्यक्त केला जात आहे. पण बाबर आझमच्या नंबर वन होण्यामागे देखील विराट कोहलीचं योगदान आहे आणि खुद्द बाबर आझमनंच याबाबतचा खुलासा केला आहे. (babar azam recalls how virat kohlis advice helped him improve his game)
विराट कोहलीला धक्का; पाकिस्तानचा बाबर आझम ठरला 'Cover Drive King'!
विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करू शकलेला नाही. याचीच बाबर आझमला संधी मिळाली. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत बाबर आझम तुफान फॉर्मात दिसला. बाबर आझमनं तीन सामन्यांच्या मालिकेत ७६ च्या सरासरीनं २२८ धावा केल्या. भारतीय संघ सध्या येत्या काही कालावधीतही वनडे मालिका खेळणार नाहीय. त्यामुळे आयसीसीच्या क्रमवारीत बाबर आझम पुढचे काही महिनेतरी अव्वल स्थानी कायम राहील असंच चित्र आहे.
नंबर वन होण्यामागे कोहलीचाच सल्ला
आयसीसीच्या क्रमवारीत नंबर वन बनल्यानंतर बाबर आझमनं सांगितलं की, विराट कोहलीनं दिलेला सल्ला खूप कामी आला. "सुरुवातीच्य काळात मी नेट्स सेशनला इतकं महत्व देत नव्हतो. पण विराट कोहलीसोबत या संदर्भात माझी एकदा चर्चा झाली होती. कोहलीनं मला नेट सेशनला महत्व देण्याचा सल्ला दिला होता. नेट्समध्ये तर तुम्ही आऊट होताय आणि खराब शॉट्स खेळताय तर सामन्यातही तुमच्यासोबत तेच होतं. विराटनं दिलेल्या सल्ल्याचा मी विचार केला आणि त्यानुसारच नेट्समधील सरावाकडे अधिक गांभीर्यानं पाहायला सुरुवात केली. आता जर माझं नेटमधील सेशन खराब राहिलं तर माझा संपूर्ण दिवस खराब जातो", असं बाबर आझमनं सांगितलं.
पाकचा बाबर आझम आशियातील 'फास्टर फेणे'; टीम इंडियाच्या कॅप्टन कोहलीचा विक्रम मोडला
आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करणारा बाबर आझम पाकिस्तानचा चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी जहीर अब्बास, जावेद मियाँदाद आणि मोहम्मद युसूफ यांनीही वनडे क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करण्याची किमया साधली आहे.
Web Title: babar azam recalls how virat kohlis advice helped him improve his game
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.