Join us  

बाबर आजम, शाहिन आफ्रिदीसह चार महत्त्वाच्या खेळाडूंना पाकिस्तान बाकावर बसवणार; जाणून घ्या असं का करणार!

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपापले संघ जाहीर केले आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी सर्वच संघ आपापल्या खेळाडूंची चाचपणी करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 10:23 AM

Open in App

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपापले संघ जाहीर केले आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी सर्वच संघ आपापल्या खेळाडूंची चाचपणी करत आहेत. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम यानं यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर दावा सांगताना संयुक्त अरब अमिराती होणारी स्पर्धा ही घरच्या मैदानावरच होणार असल्यानं आनंद व्यक्त केला आहे. पण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर इंग्लंड व न्यूझीलंड संघांविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. त्याआधी पुढील महिन्यात पाकिस्तानचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेत पाकिस्तान बाबर आजम, मोहम्मद रिझवान, शाहिन आफ्रिदी आणि हसन अली या चार प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विचारात आहेत.  

लिओनेल मेस्सीनं डोळे पुसले त्या 'टिशू पेपर'ला भारी डिमांड; कारण अन् किंमत जाणून बसेल धक्का!

ESPNcricinfoनं दिलेल्या वृत्तानुसार या खेळाडूंवरील कामाचा भार लक्षात घेता या खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता या खेळाडूंना विश्रांतीची गजर आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात पाकिस्ताननं अन्य संघांच्या तुलनेत सर्वाधिक सामने खेळले आहेत. याकाळात पाकिस्तान संघानं अनेक देशांचे दौरे केले आणि त्यांना सतत बायो बबलमध्ये रहावे लागले आहेत. रिझवान ( ४४) आणि बाबर आजम ( ४०) यांनी एप्रिल २०२०पासून आतापर्यंत अन्य खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 

India vs England : भारतीय संघावर ओढावलं संकट?; इंग्लंडच्या गोलंदाजाची दोन खेळाडूंनी अडवली वाट, अन्...

शाहिन आफ्रिदीनं ३७, तर हसननं २० सामने खेळले आहेत. शिवाय हे चारही खेळाडू पाकिस्तान सुपर लीगच्या दोन पर्वातही आपापल्या फ्रँचायझींकडून खेळले आहेत. त्यामुळे या प्रमुख खेळाडूंवरील कामाचा ताण लक्षात घेता त्यांना विश्रांती देण्यात येणार आहे. हे चारही खेळाडू पाकिस्तानच्यी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात. अफगाणिस्तानविरुद्धची वन डे मालिका ही वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग आहे, त्याला अधिक महत्त्व दिले जायला हवं होतं. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्यांचा संघ या चार प्रमुख खेळाडूंशिवाय अफगाणिस्तानला नमवतील असा विश्वास आहे.

T20 World Cup : अ‍ॅरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ बाबत झाला निर्णय, ऑस्ट्रेलियानं जाहीर केला वर्ल्ड कपसाठी संघ!

''मागील वर्षांपासून हे खेळाडू सातत्यानं खेळत आहेत आणि त्यामुळे त्यांना विश्रांती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे संपूर्ण लक्ष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर आहे आणि त्यासाठी सर्व खेळाडू मानसिक व शारीरिक तंदुरुस्त रहावेत, हा आमचा प्रयत्न आहे,''असे मोहम्मद रिझवान याने सांगितले. बाबर आजम व रिझवान यांच्या अनुपस्थितीत शाबाद खान हा संघाचे नेतृत्व सांभाळण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तान
Open in App