पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) सध्या सुरू असलेल्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी एका आश्चर्यकारक कारणामुळे चर्चेत आला आहे. बाबर आजम या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहे आणि त्याची शॉपिंग तो भारतात करत आहे. त्याने लग्नासाठी पारंपरिक भारतीय पोशाख असलेल्या डिझायनर शेरवानीवर तब्बल सात लाख रुपये खर्च केले.
ही बातमी आश्चर्यकारक आहे, कारण १९९२ मधील वर्ल्ड कप विजेत्या पाकिस्तानी संघाची सध्याच्या वर्ल्ड कपमधील कामगिरी फार समाधानकारक झालेली नाही आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी तो कोलकाता येथे पोहोचला होता. एखाद्या कर्णधाराने अशा महत्त्वाच्या स्पर्धेदरम्यान लग्नाच्या खरेदीत गुंतणे हे क्रिकेट वर्तुळात भुवया उंचावण आणि संभाव्य वादविवादाला आमंत्रण देण्यासारखे आहे.
बाबर आजमचे लग्न या वर्षाच्या अखेरीस होणार आहे, ज्यामुळे त्याच्या अवाजवी खरेदीची वेळ अधिक अनपेक्षित बनली आहे. आजमने प्रसिद्ध भारतीय डिझायनर बुटीक, Sabyasachi येथे डिझायनर शेरवानी खरेदी केली होती, जे त्यांच्या उत्कृष्ट वधू आणि वरच्या पोशाखांसाठी ओळखले जाते. शेरवानी व्यतिरिक्त, आजमने दागिने बनवणाऱ्या कंपनीकडून बऱ्यापैकी किमतीचे दागिने विकत घेतल्याचे सांगितले जात आहे. आजमचे नातेवाईकही लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.