ICCच्या पुरस्कारात मिळालं नाही स्थान; पाकिस्तान क्रिकेट मंडळानं जाहीर केले २०२०चे पुरस्कार!

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) यानं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: January 2, 2021 10:37 AM2021-01-02T10:37:37+5:302021-01-02T10:37:59+5:30

whatsapp join usJoin us
Babar Azam won the Most Valuable Player of the Year 2020 award; Pakistan’s Yearly Awards 2020 – Who Won What? | ICCच्या पुरस्कारात मिळालं नाही स्थान; पाकिस्तान क्रिकेट मंडळानं जाहीर केले २०२०चे पुरस्कार!

ICCच्या पुरस्कारात मिळालं नाही स्थान; पाकिस्तान क्रिकेट मंडळानं जाहीर केले २०२०चे पुरस्कार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या दशकातील पुरस्कारांमध्ये एकाही पाकिस्तानी खेळाडूचे नाव नसल्यानं माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. दशकातील सर्वोत्तम वन डे, ट्वेंटी-20 आणि कसोटी संघातही पाकिस्तानी खेळाडूला स्थान मिळालेले नाही. ट्वेंटी-20 संघावरून हा आयसीसीचा नव्हे, तर आयपीएलचा संघ असल्याची टीका पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी केली. याच नैराश्याच्या वातावरणात पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) शनिवारी त्यांच्या वार्षिक पुरस्काराची घोषणा केली. २०२०मधील कामगिरीची नोंद घेत PCBने हे पुरस्कार जाहीर केले आहेत.

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) यानं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. मोहम्मद हाफिज, शाहीद शाह आफ्रिदी आणि हॅरिस रॉफ हे या शर्यतीत होते, परंतु बाबरनं हा पुरस्कार जिंकला. २०२०वर्षात बाबरनं वन डे क्रिकेटमध्ये २२१ आणि ट्वेंटी-20 त २७६ धावा केल्या आहेत.  कसोटीतही त्यानं ६७.६०च्या सरासरीनं ३३८ धावा केल्या. २६ वर्षीय फलंदाजानं यंदाच्या वर्षात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून ७ अर्धशतकं व दोन शतकं ठोकली.  

यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यानं सर्वोत्तम कसोटीपटूचा मान पटकावला. २८ वर्षीय खेळाडूनं ४३.१४च्या सरासरीनं ३०२ धावा केल्या. यष्टिमागे त्यानं पाच सामन्यात १२ बळी टिपले. 

पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी  

  1. Most Valuable Cricketer of the Year – बाबर आझम
  2. Test Cricketer of the Year – मोहम्मद रिझवान 
  3. White-ball Cricketer of the Year – बाबर आझम 
  4. Individual Performance of the Year – फवाद आलम ( १०२ वि. न्यूझीलंड, पहिली कसोटी)  
  5. Women’s Cricketer of the Year – आलिया रियाझ 
  6. Domestic Cricketer of the Year – कामरान घुलाम  
  7. Men’s Emerging International Cricketer of the Year – नसीम शाह 
  8. Men’s Emerging Cricketer of the Year – रोहैल नाझीर 
  9. Women’s Emerging Cricketer of the Year – फातिमान साना 
  10. Umpire of the Year – आसीफ याकूब 

Web Title: Babar Azam won the Most Valuable Player of the Year 2020 award; Pakistan’s Yearly Awards 2020 – Who Won What?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.