Dewald Brewis vs Rahul Chahar, IPL 2022 MI vs PBKS Video: 6 6 6 6 ........ Baby AB चा BIG पराक्रम! 'मुंबई इंडियन'च्या माजी खेळाडूला ठोकले ४ चेंडूत ४ षटकार

बेबी एबीचे पहिले अर्धशतक केवळ एका धावेने हुकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 10:38 PM2022-04-13T22:38:40+5:302022-04-13T22:39:41+5:30

whatsapp join usJoin us
Baby AB Dewald Brewis hits 4 sixes in former Mumbai Indians spinner Rahul Chahar Over IPL 2022 MI vs PBKS Video | Dewald Brewis vs Rahul Chahar, IPL 2022 MI vs PBKS Video: 6 6 6 6 ........ Baby AB चा BIG पराक्रम! 'मुंबई इंडियन'च्या माजी खेळाडूला ठोकले ४ चेंडूत ४ षटकार

Dewald Brewis vs Rahul Chahar, IPL 2022 MI vs PBKS Video: 6 6 6 6 ........ Baby AB चा BIG पराक्रम! 'मुंबई इंडियन'च्या माजी खेळाडूला ठोकले ४ चेंडूत ४ षटकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Dewald Brewis vs Rahul Chahar, IPL 2022 MI vs PBKS Video: पंजाबच्या फलंदाजांनी धुलाई करत मुंबईच्या संघाला १९९ धावांचे मोठे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने चांगली सुरूवात केली होती पण तो लवकर बाद झाला. पण बेबी एबीने पंजाबच्या गोलंदाजांना दणका दिला. Mumbai Indians ने करारमुक्त केलेला राहुल चहर पंजाबकडून गोलंदाजीसाठी आला. त्याच्या षटकाचा बेबी एबीने चांगलाच समाचार घेतला. पहिल्या चेंडूवर तिलक वर्माने एक धाव काढली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बेबी एबीने चौकार मारला. पण तो तिथेच थांबला नाही. त्यापुढील चारही चेडूंवर त्याने चार षटकार लगावले. त्यामुळे राहुल चहरची एक ओव्हर पंजाबला तब्बल २९ धावांना पडली.

दरम्यान, त्याआधी, कर्णधार मयंक अग्रवालने ३२ चेंडूत ५२ तर शिखर धवनने ५० चेंडूत ६० धावांची शानदार खेळी करत संघाला चांगली सलामी दिली. जॉनी बेअरस्टो १२ तर लियम लिव्हिंगस्टोन २ धावांवर बाद झाले. आता धावसंख्या आवाक्यात येणार असं वाटत असतानाच जितेश शर्माने नाबाद ३० धावांची खेळी करत संघाला १९८ पर्यंत मजल मारून दिली.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (किपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थंपी

पंजाब किंग्ज संघ: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (किपर), लियम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग

Web Title: Baby AB Dewald Brewis hits 4 sixes in former Mumbai Indians spinner Rahul Chahar Over IPL 2022 MI vs PBKS Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.