भारत-इंग्लंड ( India vs England T20I Series) यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेत पाहुण्यांनी २-१ अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) नाबाद ७७ धावांची खेळी केली, परंतु इंग्लंडच्या जोस बटलरनं ( Jos Buttler) ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह नाबाद ८३ धावा चोपून इंग्लंडला विजय मिळवून दिला. जॉनी बेअरस्टोनं २८ चेंडूंत ५ चौकारासह नाबाद ४० धावा केल्या. इंग्लंडनं हा सामना ८ विकेट्स व १० चेंडू राखून जिंकला. पण, या पराभवानंतरही विराटला सुखावणारी बातमी समोर आली आहे. तेच दुसरीकडे सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या लोकेश राहुलला ( KL Rahul) फटका बसला आहे. लोकेश राहुल चॅम्पियन!; सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या मित्राची विराट कोहलीकडून पाठराखण
आयसीसीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 क्रमवारीत विराट कोहलीनं एक स्थान वर झेप घेताना पाचवा क्रमांक पटकावला. विराटनं दुसऱ्या ट्वेंटी-२०त नाबाद ७३ धावा केल्या होत्या आणि तिसऱ्या ट्वेंटी-२०त नाबाद ७७ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याची ट्वेंटी-२० क्रमवारीत आगेकूच झाली. लोकेश राहुल एक क्रम खाली घसरला असून तो पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमने त्याला मागे टाकले. नंबर वन बनण्याची संधी गमावली, विराट कोहलीच्या पाच निर्णयानं टीम इंडियाची गोची केली!
वन डे क्रमवारीत विराट कोहली व रोहित शर्मा अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.