Join us  

Ruturaj Gaikwad : CSKच्या ऋतुराज गायकवाडची तुफान फटकेबाजी; सलग दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी

Back to back fifties for Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा फॉर्म सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेतही कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 4:22 PM

Open in App

Back to back fifties for Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा फॉर्म सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेतही कायम आहे. आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक ६३५ धावा करून ऑरेंज कॅप नावावर करणाऱ्या ऋतुराजनं तामिळनाडू आणि पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. आयपीएल २०२१त त्यानं नाबाद १०१ धावांसह ४५.३५च्या सरासरीनं धावा चोपल्या होता आणि तोच फॉर्म घेऊन तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ( Syed Mushtaq Ali Trophy) महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. कर्णधाराची जबाबदारी खांद्यावर असूनही ऋतुराजनं त्याचा परिणाम कामगिरीवर होऊ दिलेला नाही.

गुरुवारी महाराष्ट्र संघाला तामिळनाडूकडून १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. तामिळनाडूच्या ४ बाद १६७ धावांच्या प्रत्युत्तरात महाराष्ट्राला ६ बाद १५५ धावा करता आल्या. यात सलामीवीर ऋतुराजनं ३० चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ५१ धावा चोपल्या,  परंतु त्याला सामना जिंकून देता आला नाही. पण, ती कसर त्यानं आज पंजाबविरुद्धच्या सामन्यात भरून काढली. त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर महाराष्ट्रानं ७ विकेट्स व १५ चेंडू राखून विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबला ६ बाद १३७ धावा करता आल्या. महाराष्ट्राच्या दिव्यांग हिंमगाणेकर ( २-१७), आशय पालकर ( २-३०) आणि मुकेश चौधरी ( १-२६) यांची कामगिरी उत्तम झाली. त्यांना अन्य गोलंदाजांचीही चांगली साथ मिळाली. पंजाबकडून शुबमन गिल ( ४४) व गुरकिरत सिंग मान ( ४१) हे दोघंच खेळले. प्रत्युत्तरात ऋतुराजनं ५४ चेंडूंत ८ चौकार व ३  षटकार खेचताना ८० धावा चोपल्या. नौशाद शेख ( २३) व अझिम काझी ( २८*) यांची उत्तम साथ दिली.  महाराष्ट्रानं हा सामना १७.३ षटकांत ३ बाद १३८ धावा करून जिंकला.  

टॅग्स :ऋतुराज गायकवाडमहाराष्ट्रपंजाबटी-20 क्रिकेट
Open in App