ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ सध्या बिग बॅश लीग ( BBL ) गाजवतोय.... स्मिथ वन डे व कसोटी सामन्यांसाठी फिट असल्याची चर्चा अनेक वर्ष सुरू आहे. पण, त्याने ट्वेंटी-२० सारख्या झटपट क्रिकेटमध्येही स्वतःची उपयुक्तता अनेकदा सिद्ध केली आहे. यंदाच्या बिग बॅश लीगमध्ये त्याने तर धम्माल उडवली आहे. सिडनी सिक्सर्स ( Sydney Sixers) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मिथने शनिवारी सिडनी थंडर ( Sydney Thunder ) संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. बिग बॅश लीगमधील हे त्याचे सलग दुसरे शतक ठरले.
सलामीवीर जोश फिलिप्स ( १०) व कर्टीस पॅटर्सन ( २) हे ३२ धावांवर माघारी परतल्यानंतर स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार मोईजेस हेन्रीक्ससह खिंड लढवली. पावसामुळे हा सामना १९-१९ षटकांचा खेळवण्यात आला अन् त्यात स्मिथचे वादळ घोंगावले. स्मिथ व हेन्रीक्स यांनी ९० चेंडूंत नाबाद १५५ धावांची विक्रमी भागीदारी करताना संघाला २ बाद १८७ धावांचा टप्पा गाठून दिला. स्मिथने ६६ चेंडूंत नाबाद १२५ धावांची खेळी केली. त्यात ५ चौकार व ९ षटकारांचा समावेश आहे. हेन्रीक्सनेही ३६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४५ धावा केल्या.
मागील सामन्यात सिडनी सिक्सर्सची सुरुवात खराब झाली होती. त्यांची पहिली विकेट केवळ ३ धावांवर पडली. पण, ही विकेट पडल्यानंतर स्टीव्ह स्मिथच्या बॅटने आग ओकायला सुरूवात केली. त्याने ट्वेंटी-२० मधील दुसरे शतक झळकाले. स्टीव्ह स्मिथने अॅडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध अवघ्या ५६ चेंडूत १०१ धावा केल्या. या दरम्यान त्याने १२ वेळा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. त्याने आपल्या डावात ७ षटकार आणि ५ चौकार ठोकले.
आजच्या शतकासह स्मिथने या विक्रमात स्थान पटकावले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Back-to-back hundreds for Steve Smith in Big Bash; smashed 125* from 66 balls including 5 fours & 9 sixes for Sydney Sixers against Sydney Thunder Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.