Join us  

Virat Kohli RCB, IPL 2022: विराटच्या बंगळुरू संघाचं नशिबच खराब! सामने जिंकायला लागले तर आली वाईट बातमी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांपैकी पहिला सामना हारला होता, पण त्यानंतर पुढचे दोनही सामने जिंकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 2:59 PM

Open in App

Virat Kohli RCB, IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या अटीतटीच्या लढतीत मंगळवारी थरारक विजय मिळवला. जोस बटलरच्या ७० धावांच्या बळावर RR ने २० षटकात ३ बाद १६९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना RCBची अवस्था ५ बाद ८७ झाली होती. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाद अहमद या दोन फलंदाजांनी संपूर्ण सामनाच पालटला. त्यामुळे आता बंगळुरूचा संघ समतोल आणि भक्कम होत असल्याचं दिसतंय. पण असं असतानाच RCB च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा अद्याप IPL 2022 साठी RCB संघात सामील झालेला नाही. हेजलवूड किमान आठवडाभर तरी संघनिवडीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. पाकिस्तान दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असलेला हेजलवूड पुढील काही दिवसांत संघात सामील होणार असून निवडीसाठी उपलब्ध होण्यापूर्वी त्याला तीन दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. १२ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्याआधी कदाचित तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेजलवूड येत्या काही दिवसांत संघात सामील होईल. इतर खेळाडूंप्रमाणे तो पाकिस्तान मालिकेनंतर थेट त्याच्या फ्रेंचायझीमध्ये सामील झाला नाही. हेझलवुडने वैयक्तिक कारणांमुळे काही दिवसांची सुट्टी घेतली होती. दुसरीकडे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CSA) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बोर्डाच्या करार यादीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना ६ एप्रिलपूर्वी IPL सामन्यांच्या निवडीसाठी उपलब्ध राहता येणार नाही. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल उपलब्ध असूनही मंगळवारच्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही.

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीआॅस्ट्रेलियाग्लेन मॅक्सवेल
Open in App