मुंबई : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्यातही भाराताने दमदार विजय मिळवला. पण या विजयाचा आनंद भारतीयांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकू शकला नाही. कारण या सामन्यानंतर भारतासाठी एक वाईट बातमी आली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या चौथ्या ट्वेंटी-20 सामना नाट्यमय झाला. मनीष पांडेच्या नाबाद अर्धशतकी खेळीला किवींच्या कॉलीन मुन्रोनं तुफान फटकेबाजीनं उत्तर दिलं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी मोक्याच्या क्षणाला झेल सोडल्यानंही सामना किवींच्या पारड्यानं झुकला. किवींनी मालिकेतील पहिल्या विजयाची नोंद करताना टीम इंडियाच्या घोडदौडीला ब्रेक लावला. मुन्रोनंतर टीम सेइफर्टनं दमदार खेळ केला. त्याच्या अर्धशतकी खेळीला रॉस टेलरची तुल्यबळ साथ मिळाली. अखेरच्या षटकात टेलरच्या विकेटनं सामन्यात चुरस निर्माण केली. टीम सेइफर्टही धावबाद झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर डॅरील मिचेलही झेलबाद झाला. शार्दूल ठाकूरनं अखेरच्या षटकात किवींच्या चार फलंदाजांना बाद करून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्यात किवींचे 14 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं पार केले.
चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात कोहली चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला होता. या सामन्यातील अखेरच्या षटकामध्ये न्यूझीलंडचा फलंदाज बाद झाल्यावर कोहलीने त्याच्यापुढे जाऊन आपला आक्रमकपणा दाखवला होता. त्यामुळे काही चाहते नाराजही झाले होते.
चौथा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. अखेरच्या दोन षटकांमध्ये भारताने भेदक मारा करत आपल्या बाजूने सामना झुककवला. भारताचे युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर यांनी यावेळी भेदक मारा केला. अखेरच्या दोन षटकांमध्ये भारताच्या बाजूने सामना फिरला असला तरी त्यामुळेच त्यांच्या संक्रांत कोसळल्याचे पाहायला मिळाले.
भारताने या सामन्यात दोन षटके उशिरा टाकल्याचे पाहायला मिळाले. निर्धारीत वेळेनुसार भारतीय संघाने दोन षटके उशिरा टाकली आणि या गोष्टीचाच फटका संघाला बसला आहे. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीला ही चूक दाखवून दिली. कोहलीने ही चूक मान्य केली. त्यामुळे आता भारतीय संघातील खेळाडूंच्या मानधनातून ४० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे.
Team Indiaच्या विजयाचे रहस्य आहे तरी काय, व्हिडीओ झाला वायरल...
टीम इंडिया सध्या भन्नाट फॉर्मात आहे. भारताने जानेवारी महिन्यात तीन मालिका जिंकलेल्या आहेत. त्यामुळे भारताच्या या विजयाचे रहस्य आहे तरी काय, असा सवाल चाहते विचारू लागले आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघाचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.
अन् सामन्याला नाट्यमय कलाटणी
किवींना 51 चेंडूंत 71 धावांची गरज असताना मुन्रो धावबाद झाला. त्यानंतर युजवेंद्र चहलनं टॉम ब्रुसला शून्य धावावर त्रिफळाचीत केले. त्यामुळे एकेकाळी फ्रंटसीटवर बसलेला किवी संघ पुन्हा बॅकसीटवर गेला. त्यानंतर किवी फलंदाजांवर दडपण आलेलं पाहायला मिळालं. येथे टीम इंडियाच्या गोलंदाजांनी समजुतीनं गोलंदाजी केली असती तर सामन्याला कलाटणी देता आली असती. त्यात नवदीप सैनीकडून सेइफर्टचा झेल सुटला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर बुमराहनंही त्याचाच झेल सोडला. त्यानंतर किवी फलंदाजांनी सामना आपल्या बाजूनंच ठेवला. पण, सामन्याच्या अखेरच्या षटकात शार्दूल ठाकूरनं दुसऱ्या चेंडूवर रॉस टेलरला बाद करून सामन्यात चुरस कायम राखली. श्रेयस अय्यरनं अप्रतीम झेल टिपला. त्यानंतर सेइफर्टही धावबाद झाला. त्यामुळे सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. पाचव्या चेंडूवर डॅरील मिचेल झेलबाद झाला. अखेरच्या चेंडूवर किवींना दोन धावांची गरज असताना मिचेल सँटनरला एकच धाव घेता आली आणि सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरचा थरार...
टीम सेइफर्ट आणि कॉलीन मुन्रो फलंदाजीला आले. जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यरनं झेल सोडला.. त्यावर दोन धावा घेत सेइफर्टनं चौकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा सेइफर्टचा झेल लोकेश राहुलकडून सुटला. पण, चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टनं सुंदरनं त्याला झेलबाद केले. अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत किवींनी भारतासमोर विजयासाठी 14 धावांचे लक्ष्य ठेवले.
भारताकडून विराट कोहली अन् लोकेश राहुल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरले. टीम साउदीच्या पहिल्याच चेंडूवर लोकेशनं षटकार खेचला, दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचून त्यानं धावांचं अन् चेंडूंमधील अंतर कमी केलं. टीम इंडियाला चार चेंडूवर चार धावा हव्या होत्या. पण, तिसऱ्या चेंडूवर लोकेश झेलबाद झाला. कोहलीनं चौथ्या चेंडूवर दोन धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियानं बाजी मारली.
चौथ्या सामन्यात भारताच्या मनीष पांडेची दमदार खेळी पाहायला मिळाली, त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचा भेदक मारा पाहायला मिळाला. या दोघांनीच भारतीय संघाच्या विजयाचे रहस्य सांगितले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केला असून तो चांगलाच वायरल झाला आहे.
सामन्याला सुरुवात होण्याच्या अर्ध्यातासापूर्वी न्यूझीलंड कर्णधार केन विलियम्सननं दुखापतीमुळे माघार घेतील. त्यामुळे टीम साउदीच्या नेतृत्वाखाली किवी मैदानावर उतरले. मालिकेत 0-3 अशा पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंडनं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. इश सोढीची फिरकी अन् मिचेल सँटनरच्या अप्रतिम झेलच्या जोरावर यजमानांनी टीम इंडियाच्या धावांवर लगाम लावला. लोकेश राहुलनं फॉर्म कायम राखला, परंतु त्याला अन्य फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. मनीष पांडेनं अखेरच्या षटकांत खिंड लढवताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीला येण्याची संधी मिळालेल्या संजू सॅमसननं निराश केले. श्रेयस अय्यर आज अपयशी ठरला, तर शिवम दुबेला आज मोठी खेळण्याची संधी होती, तीही त्यानं गमावली. लोकेश राहुलनं जबाबदारीनं खेळ केला. त्यानं ट्वेंटी-20 4000 धावांचा पल्ला पार केला. लोकेशनं 26 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 39 धावा केल्या. इश सोढीनं 4 षटकांत 26 धावांत तीन विकेट्स घेतल्या. सँटनरनेही 4 षटकांत 26 धावा देत एक विकेट घेतली. त्यानंतर मनीष पांडे आणि शार्दूल ठाकूर यांनी टीम इंडियाची लाज राखली. मनीषनं अखेरच्या षटकांत साजेसा खेळ करताना संघाला 8 बाद 165 धावांपर्यंत मजल मारून दिली. हॅमिश बेन्नेटनंही दोन केट्स घेतल्या. मनीष 37 चेंडूंत 3 चौकारांसह 50 धावांवर नाबाद राहिला.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मार्टीन गुप्तीलचा ( 4) अडथळा दूर करतान जसप्रीत बुमराहनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. किवींनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 39 धावा केल्या. पण, टीम सेइफर्ट आणि कॉलीन मुन्रो यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. मुन्रोनं 38 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. किवींनी पहिल्या 10 षटकांत 1 बाद 79 धावा केल्या होत्या. 12व्या षटकात मुन्रो धावबाद झाला. विराट कोहलीच्या डायरेक्ट हिटनं टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. मुन्रोनं 47 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार ठोकून 64 धावा केल्या.
Web Title: Bad news for Indian fans; Team India done the 'this' thing on the field and get 40 percent fine
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.