Commonwealth Games 2022, Badminton : बॉक्सर शिवा थापाने ( Shiva Thapa) पाकिस्तानी खेळाडू आसमान दाखवल्यानंतर भारताच्या बॅडमिंटनपटूंनीही India vs Pakistan सामन्यात वर्चस्व गाजवले. पी व्ही सिंधू, श्रीकांत किदम्बी या स्टार खेळाडूंनी मिश्र सांघिक गटाच्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानचा ५-० असा सुफडा साफ केला. भारतीय खेळाडूंसमोर पाकिस्तानचा निभावच लागला नाही. पाचही डावात भारताने २-० अशी सहज बाजी मारली. #Hockey भारतीय महिला संघाने अ गटातील पहिल्याच सामन्यात घानावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. गुरजित कौरने दोन, संगिता कुमारी, सलिमा टेटे व नेहा यांनी प्रत्येकी एक गोल केला. अश्विनी पोनप्पा व बी सुमिथ रेड्डी यांनी मिश्र दुहेरीत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या मुहम्मद भट्टी व घझाला सिद्दीकी यांचा २१-९, २१-१२ असा पराभव केला. किदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत पाकिस्तानच्या मुराद अलीचा २१-७, २१-१२ असा सहज पराभव करून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. त्यानंतर झालेल्या महिला एकेरीत पी व्ही सिंधूने २१-७, २१-६ अशा फरकाने महूर शहजादचा पराभव करताना भारताची आघाडी ३-० अशी वाढवली आणि विजय पक्का केला. सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या सामन्यात पाकिस्तानी जोडी मुराद अली व इरपान सईद भट्टी यांनाही डोकं वर काढू दिलं नाही. भारतीय जोडीने २१-१२, २१-९ असा विजय मिळवला. महिला दुहेरीच्या लढतीत ट्रीसा जॉली व गायत्री गोपिचंद या जोडीने २१-४, २१-५ अशा फरकाने पाकिस्तानच्या महूर शहजाद व घझाला सिद्दीकी यांचा पराभव केला.
- बॉक्सर शिवा थापा ( Shiva Thapa) याने ६३.५ किलो गटातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा ५-० असा पराभव केला.
- टेबल टेनिस महिला सांघिक गट - भारताचा मनिका बात्राचा ११-५, ११-३, ११-२ असा दक्षिण आफ्रिकेच्या मुश्फीक कलामवर विजय
- Lawn Bowls मध्ये भारताच्या तानिया चौधरीला १०-२१ अशा फरकाने स्कॉटलंडच्या डी हॉगनकडून पराभव पत्करावा लागला. पुरुष गटातही भारताला न्यूझीलंडकडून ६-२३ अशी हार मानावी लागली.
- Cycling Men's Team Pursuit गटात भारताने ४००० मीटर पात्रता स्पर्धेत ४:१२.८६५ सेकंदाची वेळ नोंदवली
- टेबल टेनिस महिला सांघिक गटात भारताची दणक्यात सुरूवात झाली. त्यांनी ३-० अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेवर मात केली.
- Swimming Men's 100m Backstroke Heats: भारताच्या श्रीहरी नटराजने पात्रता फेरीत ५५.६८ सेकंदाची वेळ नोंदवरून पाचव्या स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला
- Table Tennis महिला संघाप्रमाणे भारताच्या पुरुष संघानेही पहिल्याच सामन्यात बार्बाडोसवर ३-० असा सहज विजय मिळवून आगेकूच केली. शरथ कमल, साथियन जी व हरमीत देसाई यांचा भारतीय संघात समावेश आहे.cr