मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज आयुष बदोनीने गुरुवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध जबरदस्त षटकार मारला. हा चेंडू सीएसकेच्या चाहतीच्या डोक्यावर आदळला. १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही घटना घडली.
लखनऊला शेवटच्या दोन षटकांत ३४ धावांची गरज होती. चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने १९ वे षटक टाकण्यासाठी मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेकडे चेंडू दिला. शिवम दुबेच्या पहिल्याच चेंडूवर या तरुणाने अविश्वसनीय संतुलन दाखवले. आयुषने शिवमच्या वाइड यॉर्करवर एक शानदार लॉफ्टेड स्वीप मारला. आयुषचा हा शॉट सीमेबाहेर ८५ मीटर अंतरावरील प्रेक्षक गॅलरीत पडला. दुर्दैवाने चेंडू महिला चाहतीच्या डोक्याला लागला. चाहतीने हाताने चेंडू पकडून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला यश आले नाही. तिच्यासोबत तिचे काही मित्रही होते. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. तिला वेदना होत असल्याचे दिसत होते. बदोनीने दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या.
ब्राव्होपुढे जोखीम पत्करायची नव्हती
बदोनी म्हणाला, ‘ड्वेन ब्राव्होपुढे कुठलीही जोखीम पत्करायची नव्हती. अखेरच्या दोन षटकांत फटकेबाजी करून सामना जिंकू शकतो, असा विश्वास होता. २१० धावांचे आव्हान माझ्या मते भक्कम होते. मात्र, आम्ही चांगल्या पद्धतीने ते गाठले. मला केवळ स्वाभाविक फटकेबाजीची भूमिका बजावण्याचे सांगण्यात आले आहे.’
Web Title: Badoni's six; The ball hits the head of a Chennai fan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.