Join us

WTC final playing conditions : ICCच्या नियमावलीनं गोंधळात पडला वासिम जाफर, मुन्नाभाईचं मीम्स केलं पोस्ट 

WTC final playing conditions : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 12:42 IST

Open in App

भारत आणि न्यूझीलंडयांच्यात १८ ते २३ जून या कालावधीत साऊदॅम्पटन येथे WTC Final खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीनं २३ जून हा अतिरिक्त दिवस राखून ठेवला आहे, त्यामुळे या सामन्याच्या निकालासाठी सहावा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. पण, या सामन्याचा निकाल अनिर्णित किंवा बरोबरीचा लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद देण्यात येईल, असे आयसीसीनं जाहीर केलं. पण, यावरून भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर ( Wasim Jaffer) गोंधळात पडला आहे आणि त्यानं मजेशीर मीम्स पोस्ट केला आहे. (Confused over the rules, former India cricketer Wasim Jaffer posted a hilarious meme on Twitter)  निर्धारीत पाच दिवशी वाया जाणाऱ्या तासांची भरपाई राखीव दिवसात भरून काढली जाईल. त्यामुळे १८ ते २२ जूनला हा सामना खेळवण्यात येईल आणि २३ जून हा राखीव दिवस असेल. आयसीसीनं हे दोन्ही निर्णय जून २०१८मध्येच जेव्हा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली तेव्हा घेतले होते. पाच दिवसानंतरही निकाल न लागल्यास राखीव दिवशी खेळ होणार नाही आणि सामना अनिर्णित जाहीर केला जाईल.  

  • हा सामना ग्रेड १ ड्यूक क्रिकेट बॉलनं खेळवला जाईल 
  • शॉर्ट रन ( Short Runs) - मैदानावरील पंचांनी शॉर्ट रनच्या दिलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू तिसरा पंच करणार आहे.  
  • खेळाडूंचा रिव्ह्यू ( Player Reviews) - LBWचा निकाल दिल्यानंतर कर्णधार किंवा बाद झालेला फलंदाज मैदानावरील पंचांकडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालेला होता का, याबाबत विचारणा करून प्लेअर रिव्ह्यू घेऊ शकतो.
  • डीआरएस ( DRS Reviews ) - LBW साठी स्टम्पवर आदळणाऱ्या चेंडूची उंची व लांबी यावरून अम्पायर्स कॉलचा निर्णय घेतला जाईल.

 

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंडवासिम जाफर