Join us  

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाच्या डोक्यावर चेंडू आदळला अन् काळजाचा ठोका चुकला

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दुबईत सराव सामना खेळत आहे. पाकिस्ताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ येथे दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 11:23 AM

Open in App

दुबई : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दुबईत सराव सामना खेळत आहे. पाकिस्ताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ येथे दाखल झाला आहे. येथे पाकिस्तान A संघाविरुद्घच्या चार दिवसीय सराव सामन्याच्या दुसरा दिवस ऑस्ट्रेलियासाठी फारसा चांगला नाही राहिला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मॅट रेनशॉच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. रेनशॉला त्यानंतर मैदानाबाहेर जावे लागले.

22 वर्षांचा रेनशॉ आता सराव सामना खेळू शकत नाही. फिरकीपटू नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर पाकिस्तान A संघाच्या आबिद अलीने जोरदार फटका मारला. हा चेंडू थेट शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या रेनशॉच्या हेल्मेटवर आदळला. तो चेंडू यष्टिरक्षक टिम पेनने टिपला आणि ऑस्ट्रेलियाला विकेट मिळाली. मात्र, रेनशॉला जबर दुखापत झाली. रेनशॉने आपले हेल्मेट काढले आणि डोक पकडून तो मैदानावरच बसून राहिला. कर्णधार टिम पेन आणि मेडिकल स्टाफने त्याला उभे केले आणि मैदानाबाहेर नेले.

रेनशॉच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाने अंतिम अकरा खेळाडूंमध्ये मार्नस लाबुशेनचा समावेश केला. पाकिस्तान संघानेही त्यांना मान्यता दिली. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तान