सिडनी: चेंडू कुरतडण्याचे प्रकार ही जागितक समस्या असल्याचा दावा करीत आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी खेळपट्टीपासून कुठलीही मदत न मिळणे ही अशा घटनेमागील मूळ समस्या असल्याचे म्हटले आहे. आपल्या मार्गदर्शनात मात्र कधीही अशी घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चेंडू कुरतडल्याप्रकरणी डेरेन लेहमन यांना पद सोडावे लागल्यानंतर माजी सलामीवीर जस्टिन लँगर हे खेळाडूंची वागणूक सुधारण्यावर भर देत असून संघाची पत कायम करण्याकडे लक्ष देत आहेत. केपटाऊनच्या तिसऱ्या कसोटीत चेंडू कुरतडण्याचा प्रकार घडल्याचे ऐकून लँगर स्तब्ध झाले होते. पण ही एकमेव घटना नाही, असे त्यांचे मत आहे. बुधवारी अॅडम गिलख्रिस्ट याने लँगर यांची विशेष मुलाखत
घेतली. त्यात लँगर म्हणाले,‘ मैदानावर असे प्रकार करण्यात कुठलीही समजदारी नाही.चेंडू कुरतडण्याचे प्रकार जगात सर्वत्र होत असल्याची मला जाणीव आहे, अनुकूल खेळपट्टी नसल्याने अनेकदा खेळाडू सामन्याचा निकाल स्वत:कडे फिरविण्यासाठी असा मार्ग अवलंबतात. चेंडूची चमक कायम राखण्याासाठी अनेकदा घामाचा वापर केला जाऊ शकतो पण बाहेरच्या पदार्थांचा वापर करण्यास बंदी आहे. (वृत्तसंस्था)
मुद्दाम केलेल्या कृत्याने धक्का
‘चेंडूसह छेडछाड करण्यासाठी मुद्दामहून खेळाडूंनी रेगमाल मैदानात नेले होते. याची माहिती मिळाली तेव्हा मला धक्काच बसला,’ अशी प्रतिक्रीयाही लँगर यांनी दिली.
Web Title: Ball tactic type global problem; Australian coach claim
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.