Join us  

Ball tampering : चेंडूशी छेडछाड करूनच ऑस्ट्रेलियानं जिंकला होता २०१५चा वर्ल्ड कप?

आता न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ग्रॅंट एलियटने 2015 वर्ल्ड कप फायनलमध्येही ऑस्ट्रेलियन टीम बॉल टेम्परिंगमध्ये सामिल असण्यावर प्रश्न उपस्थित केलाय.  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 1:31 PM

Open in App

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात उघड झालेल्या बॉल टेम्परिंग प्रकरणाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवून सोडलंय. या घटनेत सामिल स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरन बेनक्रॉफ्ट यांच्यावर 9 महिने ते एक वर्ष बंदी घालण्यात आलीये. आता न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ग्रॅंट एलियटने 2015 वर्ल्ड कप फायनलमध्येही ऑस्ट्रेलियन टीम बॉल टेम्परिंगमध्ये सामिल असण्यावर प्रश्न उपस्थित केलाय.  

एलियटने एका रेडिओ शोमध्ये सांगितलं की, वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंडची टीम 150/3 च्या स्कोरवर होती. त्यानंतर अचानक लागोपाठ विकेट गमावत टीम 185 रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाने हे फायनल मायकल क्लार्क(74) आणि स्टीव्ह स्मिथ(56) च्या अर्धशतकांच्या भरोशावर केवळ 33.1 ओव्हरमध्येच जिंकलं होतं. 

एलियट म्हणाला की, मला जो पहिला प्रश्न विचारण्यात आला होता तो वर्ल्ड कप फायनलमध्ये काय झालं होतं? हा होता. काय ते (ऑस्ट्रेलियन) तिथेही हेच करत होते? 

एलियट म्हणाला की, या प्रकरणामुळे काही गोलंदाज आता रडारवर येतील. ते किती चांगले होते आणि किती काळापासून बॉलसोबत छेडछाड करत होते, असे प्रश्न उपस्थित होतील. 

टॅग्स :क्रिकेट