मेलबर्न : आॅस्ट्रेलियन मीडियामध्ये क्रिकेटसंघाच्या चेंडूशी छेडछाड केल्याच्या कृत्याचा जगभरातून निषेध होत आहे. आॅस्ट्रेलियन मीडियासह दिग्गजांनीही संघावर टीका केली आहे. पॅट्रिक स्मिथ यांनी ‘द आॅस्ट्रेलियन’मध्ये लिहले आहे की,‘ वरिष्ठ खेळाडूंच्या या कृत्याची आम्हाला लाज वाटते. त्यांनी खेळाची बदनामी केली. त्यामुळे देशाला त्यांची लाज वाटते’
‘ हे काय चालले आहे. हे एका वाईट स्वप्नासारखे आहे. कोणीतरी मला कृपा करून सांगा, हे खरोखरीच एक वाईट स्वप्न आहे.’ - मायकेल क्लार्क, माजी कर्णधार आॅस्ट्रेलिया
‘आॅस्ट्रेलियन संघाची चेंडूशी छेडछाड करण्याची ही पूर्व नियोजित योजना होती.’ - नासीर हुसेन, माजी कर्णधार इंग्लंड
‘मला कॅमेरुन बेनक्राफ्टबद्दल सहानुभूती वाटते कारण मला वाटत नाही की हे त्याने स्वत: केले असेल. आणि खिशात टाकले असेल. ज्याने बेनक्राफ्टला हे करण्यास सांगितले त्याच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे ’ - शेन वॉर्न
‘स्टिव्ह स्मिथ आणि संघ व्यवस्थापनाने हे मान्य करायला हवे की त्यांना त्याच्या धोकेबाजीमुळे लक्षात ठेवले जाईल - मायकेल वॉन, इंग्लंड
Web Title: Ball tampering: This 'black day' for cricket, criticizing legendary players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.