केपटाऊन : २४ वर्षांपूर्वी फानी डिव्हिलियर्सने आपल्या भेदक स्विंग गोलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाला हादरवले होते आणि आता चेंडू छेडछाड प्रकरणात आॅस्ट्रेलियाचे पितळ उघडे पाडणाऱ्यांपैकी ते एक आहेत. जानेवारी १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा अनुभवहिन संघ प्रथमच आॅस्ट्रेलियाच्या दौ-यावर गेला असताना सामना गमावण्याच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी आॅस्ट्रेलियाला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी केवळ ११६ धावांची गरज होती. कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळणाºया डिव्हिलियर्सने ४३ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते आणि दक्षिण आफ्रिकेला पाच गडी राखून विजय मिळवून दिला होता. त्या लढतीत शेन वॉर्नने १२ बळी घेतले होते. २४ वर्षांनंतर डिव्हिलियर्स न्यूलँड््समध्ये टीव्ही समालोचकाच्या भूमिकेत होते.
हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर आॅस्ट्रेलियाला रिव्हर्स स्विंग कसा मिळतो, अशी त्यांना शंका आली. डिव्हिलियर्स यांनी आॅस्ट्रेलिया रेडिओ स्टेशनला सांगितले की, त्यांनी कॅमेरामनच्या समूहाला त्याबाबत सूचना दिली. त्यात कॅमरन बेनक्रॉफ्ट पिवळ्या टेपच्या तुकड्याने चेंडूला घासत असताना पकडल्या गेला.
डिव्हिलियर्स म्हणाले...‘शंका आल्यानंतर आम्ही कॅमरामनला बघण्यास सांगितले होते. आॅस्ट्रेलियन खेळाडू चेंडूवर काहीतरी लावत होते. हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर ऐवढ्या लवकर रिव्हर्स स्विंग मिळू शकत नाही. कारण ही काही प्रत्येक सेंटिमीटर भेग असलेली पाकिस्तानातील खेळपट्टी नव्हती.’