Ball Tampering, BPL: बॉल टॅम्परिंग हा शब्द ऐकल्यावर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथचा जोहान्सबर्ग कसोटीतील प्रसंग आठवतो. या प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या तीन खेळाडूंवर मोठी कारवाई केली होती. आता अशीच घटना बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये घडली. या लीगमध्ये बॉल टॅम्परिंगची म्हणजेच चेंडू कुतरडण्याची ही पहिलीच घटना आहे. BPLमध्ये खेळणारा संघ सिल्हेट सनरायझर्स आणि त्यांचा इंग्लिश अष्टपैलू खेळाडू रवी बोपारा हे या प्रकरणात दोषी आढळले. त्यानंतर पंचांनी त्यांच्यावर मोठी कारवाई केली. खुलना टायगर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सिल्हेट सनरायझर्स संघाने बॉल टॅम्परिंगचा प्रकार केला.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू रवी बोपाराने ९व्या षटकात हा प्रकार केला. लीगचे ब्रॉडकास्ट राईट्स असणाऱ्यांनी त्या घटनेचा रिप्ले दाखवला त्यात बोपारा त्याच्या बोटांनी व नखाने चेंडू स्क्रॅच करत होता. जेव्हा ऑनफिल्ड पंच महफुजुर रहमान आणि प्रगीथ रामबुकवेला यांना बोपाराच्या या कृतीबद्दल कळलं तेव्हा त्यांनी त्याच्याकडून षटकाच्या मध्येच चेंडू काढून घेतला.
संपूर्ण संघावर झाली कारवाई
क्रिकेटच्या नियमानुसार, बोपारा हा कलम ४१.३.५ नुसार दोषी आढळला. खेळाडूकडून टॅम्परिंग झाल्याने पंचांनी चेंडू बदलला. बोपाराकडून चेंडू घेतल्यानंतर पंचांनी लगेच दुसरा चेंडू दिला आणि महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण संघालाच ५ धावांचा दंड ठोठवण्यात आला. याशिवाय, घडलेल्या प्रकाराची तक्रार फील्ड अंपायरने सामनाधिकाऱ्याकडे करू शकतात. जर तसं झालं तर त्या खेळाडूवर कठोर कारवाई केली जाऊ शकते, असाही नियमात उल्लेख आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू रवी बोपाराने या सामन्यात संघाचे कर्णधारपद सांभाळत असताना ही चूक केली. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये तब्बल ६५ सामने खेळल्यानंतर बोपाराला कर्णधारपद मिळालं होतं आणि पहिल्याच सामन्यात त्याने हा प्रकार केला.
Web Title: ball tampering in BPL by Ravi Bopara Sylhet Sunrisers penalized for 5 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.