नवी दिल्ली - चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेविड वॉर्नर यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी आपापल्या पदांवरून दूर केले आहे. तर आयसीसीने या प्रकरणात त्याला एका सामन्यासाठी निलंबन केले आहे. मॅच फीच्या शंभर टक्के दंड देखील ठोठावण्यात आला. स्मिथ आणि बेनक्रॉफ्टचे हे वर्तन खेळ भावनेच्या विरुद्ध आहे. छेडछाडीचे प्रकरण पूर्वनियोजित असल्याची कबुली स्मिथ याने दिली होती.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला देशभरातून टीकाला आणि विरोधाला सामोर जावं लागत आहे. त्यामुळं क्रिकेट ऑस्ट्रेलिया स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या विचारात आहे. टाईम्स ऑफ इंडियाला सुत्राने दिलेल्या माहितीनुसार स्मिथ आणि वॉर्नरवर आजीवन बंदी लवली जाऊ शकते. चेंडूशी छेडछाड करणारा बेनक्रॉफ्ट याला मात्र तीन डिमेरीट गुण देण्यात आले आहे. आणि सामना फीच्या ७५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. दोघांवर आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल दोनचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी आयसीसी आचारसंहितेच्या २.२.२चे उल्लंघन केल्याचा आरोप स्मिथवर ठेवला.
चेंडूशी छेडछाड प्रकरणावर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान मॅलकम टर्बुल यांनी दुख व्यक्त केलं आहे. ऑस्ट्रेलियन मीडियासह दिग्गजांनीही संघावर टीका केली आहे. पॅट्रिक स्मिथ यांनी ‘द ऑस्ट्रेलियन’मध्ये लिहले आहे की,‘ वरिष्ठ खेळाडूंच्या या कृत्याची आम्हाला लाज वाटते. त्यांनी खेळाची बदनामी केली. त्यामुळे देशाला त्यांची लाज वाटते’