'कॉफी विथ करण'मधील वादावर हार्दिक पांड्यानं सोडलं मौन, म्हणाला...

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात दिग्दर्शन करण जोहरनं विचारलेल्या एका प्रश्नावर हार्दिकनं आक्षेपार्ह उत्तर दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 11:18 AM2020-01-09T11:18:48+5:302020-01-09T11:19:46+5:30

whatsapp join usJoin us
Ball Wasn’t in My Court: Hardik Pandya on ‘Koffee with Karan’ Row | 'कॉफी विथ करण'मधील वादावर हार्दिक पांड्यानं सोडलं मौन, म्हणाला...

'कॉफी विथ करण'मधील वादावर हार्दिक पांड्यानं सोडलं मौन, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कॉफी विथ करण या कार्यक्रमात भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी दिलेल्या उत्तरानं खळबळ माजलवी होती. महिलांचा अपमान करणाऱ्या त्या वक्तव्यावरून हार्दिक व राहुल या दोघांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंही ( बीसीसीआय) या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघांना निलंबित केले होते. शिवाय त्यांना शिक्षाही सुनावली. या प्रकरणाला जवळपास वर्ष होत आले आहे आणि हार्दिकनं बुधवारी त्याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली.

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात दिग्दर्शन करण जोहरनं विचारलेल्या एका प्रश्नावर हार्दिकनं आक्षेपार्ह उत्तर दिले होते. त्याच्या या उत्तरातून महिलांचा अपमान झाला होता आणि त्यांला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. या वादानंतर बीसीसीआयनं हार्दिक व राहुल यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावले होते. दोघांनाही बीसीसीआयनं नियुक्त केलेल्या लोकपालांकडे स्पष्टिकरणही मांडावे लागले होते. शिवाय दोघांना प्रत्येकी 20 लाखांचा दंडही सुनावण्यात आला होता. तसेच शहिद जवानांच्या दहा कुटुंबाला प्रत्येकी एक लाख देण्याचे आदेश लोकपालांनी दिले होते.

या प्रकरणाबाबत हार्दिकनं बुधवारी एक खुलासा केला. तो म्हणाला,''तिथे नक्की काय घडणार हे आम्हाला माहित नव्हते. चेंडू आमच्या पक्षात नव्हता, तो दुसऱ्यांच्याच कोर्टात होता. आम्ही असुरक्षित परिस्थितीत अडकलो होतो, जिथे आम्ही असायला नको होतो.''

तेव्हा नेमकं काय घडलं होतं?
करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?
हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो).''
कुटुंबीयही  किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला,''एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. ''
करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?
लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडू
हार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं.

Web Title: Ball Wasn’t in My Court: Hardik Pandya on ‘Koffee with Karan’ Row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.