पाकिस्तानच्या कर्णधारावर चार सामन्यांची बंदी

चार सामन्यांसाठी पाकिस्तानची धुरा शोएब मलिककडे सोपवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 03:32 PM2019-01-27T15:32:35+5:302019-01-27T15:35:00+5:30

whatsapp join usJoin us
ban on Pakistan captain for Four mtches | पाकिस्तानच्या कर्णधारावर चार सामन्यांची बंदी

पाकिस्तानच्या कर्णधारावर चार सामन्यांची बंदी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दरबान, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान : पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदवर चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय मालिकेत अहमदने यजमान संघातील अष्टपैलू खेळाडू अँडिले फेलुक्वायोवर वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. आता चार सामन्यांसाठी पाकिस्तानची धुरा शोएब मलिककडे सोपवण्यात येणार आहे.

 



 

सर्फराझ अहमद नेमके काय म्हणाला होता, पाहा हा व्हिडीओ


पाकिस्तानच्या 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचे तीन फलंदाज 29 धावांवर माघारी परतले होते. युवा गोलंदाज शाहीन आफ्रीदीच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. पण, 5 बाद 80 अशा धावांवरून डुसेर आणि फेलुक्वायो यांनी आफ्रिकेचा डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या 37 व्या षटकात सर्फराजने केलेली वर्णद्वेषी टिप्पणी स्टम्प्समधील माइकमध्ये रेकॉर्ड झाली आणि वादाचा भडका उडाला. 

सर्फराज ऊर्दूत म्हणाला," अबे काले तेरी अम्मी आज कहाँ बैठी है? क्या पर्वाके आया है आज? ( तुझ्या आईने आज कोठे प्रार्थना केली की तू चांगली कामगिरी करत आहेस?)" सर्फराजचे हे वाक्य कॉमेंटेटर्सना कळले नाही आणि त्यांनी रमीझ राजाला अर्थ विचारला. त्यावर याचे भाषांतर करणे अवघड असल्याची सावध भूमिका रमीझ राजाने घेतली. 

 

Web Title: ban on Pakistan captain for Four mtches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.