बांगलादेशच्या मेहिदी, नजमूल यांची शतकी खेळी; अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची झाली शेळी! 

BAN vs AFG Live Marathi Update : बांगलादेशने ब गटातील दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानविरुद्ध आज जबरदस्त खेळ करून दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 06:45 PM2023-09-03T18:45:27+5:302023-09-03T18:46:34+5:30

whatsapp join usJoin us
BAN vs AFG Live Marathi Update : Mehidy Hasan Miraz ( 118) & Najmul Hossain Shanto ( 104) scored hundred, Bangladesh set 335 runs target to Afghanistan | बांगलादेशच्या मेहिदी, नजमूल यांची शतकी खेळी; अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची झाली शेळी! 

: Bangladesh post 334/5 (Mehidy Hasan Miraz 112, Najmul Hossain Shanto 104) in 50 overs against Afghanistan

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BAN vs AFG Live Marathi Update : आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेकडून हार पत्करलेला बांगलादेशचा संघ करो वा मरो अवस्थेत आहे. ब गटातील दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानविरुद्ध आज त्यांनी सर्वस्व पणाला लावले अन् जबरदस्त खेळ करून दाखवला. सलामीवीर मेहिदी हसन मिराझ ( Mehidy Hasan Miraz) आणि नजमूल होसैन शांतो ( Najmul Hossain Shanto) यांनी वैयक्तिक शतक झळकावून बांगलादेशसाठी धावांचा डोंगर उभा केला. ४३व्या षटकात मिराझ मनगटाने हाताला दुखापत झाल्याने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला. 


मोहम्मद नईम व मिराझ सलामीला आले आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. मुजीब उर रहमानने ही जोडी तोडली अन् नईम २८ धावांवर त्रिफळाचीत झाला. तोवहिद हृदय भोपळ्यावर गुलबदीन नईबच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या सामन्यात ८९ धावांची खेळी करणाऱ्या नजमूलने अफगाणिस्ताच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नजमूल व मिराझ यांनी तिसऱ्या विकेटसाठी १९४ धावांची विक्रमी भागीदारी केली. मिराझ हाताच्या दुखापतीमुळे ११९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ११२ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. मजमूल ४५ व्या षटकात दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. त्याने १०५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह १०५ धावा केल्या. 

: Bangladesh post 334/5 (Mehidy Hasan Miraz 112, Najmul Hossain Shanto 104) in 50 overs against Afghanistan
: Bangladesh post 334/5 (Mehidy Hasan Miraz 112, Najmul Hossain Shanto 104) in 50 overs against Afghanistan

मुश्फिकर रहिमही १५ चेंडूंत २५ धावांवर रन आऊट झाला. शाकिब अल हसन व शमीम होसैन यांनी शेवटच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. शमीम ११ धावांवर रन आऊट झाला. बांगलादेशने ५० षटकांत ५ बाद ३३४ धावांचा डोंगर उभा केला. शाकिबने १८ चेंडूंत नाबाद ३२ धावा चोपल्या.  

Web Title: BAN vs AFG Live Marathi Update : Mehidy Hasan Miraz ( 118) & Najmul Hossain Shanto ( 104) scored hundred, Bangladesh set 335 runs target to Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.