BAN vs AUS, 3rd T20I : पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं तिसऱ्या सामन्यात संघात बदल करताना बांगलादेशला ९ बाद १२७ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. कर्णधार महमुदुल्लाहनं अर्धशतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना एकट्यानं टक्कर दिली. पण, या सामन्याच्या अखेरच्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन एलिस यानं पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरला. First ever bowler to take a hattrick on T20I debut.
बांगलादेशच्या सलामीवीरांना अपयश आल्यानंतर शाकिब अल हसन आणि महमुदुल्लाह यांनी संघाचा डाव सारवला. शाकिब २६ धावांवर बाद झाला. महमुदुल्लाहनं ५२ धावांची खेळी केली. अफिप होसैननं १९, तर नुरूल सहननं ११ धावा केल्या. जोश हेझलवूड व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. एलिसनं २०व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर महमुदुल्लाह, मुस्ताफिजूर रहमान व महेदी हसन यांना बाद केले अन् विक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-२० हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी ब्रेट ली ( वि. बांगलादेश, २००७) आणि अॅश्टन अॅगर ( वि. द. आफ्रिका, २०२०) यांनी अशी कामगिरी केली आहे.