BAN vs AUS : बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाची जिरवली, सलग दुसऱ्या ट्वेंटी-२०त पराभवाची जखम दिली

ढाका : पहिल्या टी २० सामन्यानंतर दुसऱ्या टी२०तही बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 10:35 PM2021-08-04T22:35:00+5:302021-08-04T22:37:16+5:30

whatsapp join usJoin us
BAN vs AUS : Bangladesh lead the five-match T20I series 2-0, Bangladesh won by 5 wickets (with 8 balls remaining) | BAN vs AUS : बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाची जिरवली, सलग दुसऱ्या ट्वेंटी-२०त पराभवाची जखम दिली

BAN vs AUS : बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाची जिरवली, सलग दुसऱ्या ट्वेंटी-२०त पराभवाची जखम दिली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ढाका : पहिल्या टी २० सामन्यानंतर दुसऱ्या टी२०तही बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करतांना १२१ धावा केल्या. हे आव्हान बांगलादेशने १८.४ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात सहज पुर्ण केले. आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २ -० अशी आघाडी घेतली आहे. आफिफ हुसेन याने नाबाद ३७ धावा केल्या. तो सामनावीर ठरला. ( Bangladesh lead the five-match T20I series 2-0! Afif Hossain and Nurul Hasan share an unbeaten 56-run stand to guide their side to a five-wicket win) 

ढाका येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. तिसऱ्याच षटकांत सलामीवीर ॲलेक्स कॅरी बाद झाला. मिशेल मार्श (४५ धावा) मोजेस हेड्रीक्स (३०) वगळता इतर फलंदाज स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ७ बाद १२१ धावा केल्या. बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमान याने ३ तर शरीफुल इस्लाम याने दोन बळी घेतले.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरूवातच खराब झाली. मिशेल स्टार्क याने सौम्य सरकार याला भोपळाही फोडु दिला नाही. तर दुसरा सलामीवीर मोहम्मद नैम यालाही हेजलवुड याने बाद केले. मत्यानंतर शकीब उल हसन आणि मेहदी हसन यांनी ३७ धावांची भागिदारी केली. त्यानंतर शकीब, महमदुल्लाह आणि मेहदी हसन  हे ९ धावांच्या अंतराने बाद झाले. त्यामुळे बांगलादेशची अवस्था ५ बाद ६७ अशी झाली होती. मात्र नुरूल हसन आणि आफिफ हसन यांनी नाबाद ५६धावांची भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

Web Title: BAN vs AUS : Bangladesh lead the five-match T20I series 2-0, Bangladesh won by 5 wickets (with 8 balls remaining)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.