BAN vs AUS : ६२ धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला, शाकिब अल हसननं विश्व विक्रम नोंदवला; आतापर्यंत फक्त दोन महिलांनी केलाय हा पराक्रम!

Bangladesh vs Australia, 5th T20I: बांगलादेश संघानं पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 01:41 PM2021-08-10T13:41:57+5:302021-08-10T13:42:34+5:30

whatsapp join usJoin us
BAN vs AUS : Shakib Al Hasan becomes the third cricketer to achieve double of 1000 runs and 100 wickets in T20Is | BAN vs AUS : ६२ धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला, शाकिब अल हसननं विश्व विक्रम नोंदवला; आतापर्यंत फक्त दोन महिलांनी केलाय हा पराक्रम!

BAN vs AUS : ६२ धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला, शाकिब अल हसननं विश्व विक्रम नोंदवला; आतापर्यंत फक्त दोन महिलांनी केलाय हा पराक्रम!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Bangladesh vs Australia, 5th T20I: बांगलादेश संघानं पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशच्या ८ बाद १२२ धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ६२ धावांवर तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यातील ऑस्ट्रेलियाची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. या सामन्यात शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) यानं वर्ल रिकॉर्ड नोंदवला. शाकिबनं ९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. बांगलादेशनं ही मालिका ४-१ अशी जिंकली. विशेष म्हणजे शाकिबनं नोंदवलेला वर्ल्ड रिकॉर्ड हा आतापर्यंत एकाही पुरुष क्रिकेटपटूला करता आलेला नाही, पण दोन महिलांनी मात्र हा पराक्रम केला आहे. 


बांगलादेशच्या शाकिबनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १०० विकेट्स घेणाऱ्या पहिल्या फिरकीपटूचा मान तर पटकावलाच शिवाय त्यानं १००० धावाही पूर्ण केल्या. शाकिबनं ८४व्या सामन्यात २० धावांत ५ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स व १००० धावा करणारा जगातला पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. ( Shakib Al Hasan, on Monday, became the first male cricketer to achieve the double of 1,000 runs and 100 wickets in T20Is). त्यानं ट्वेंटी-२० एकूण ३८१ विकेट्सही घेतल्या आहेत.  शाकिबनं कसोटीत २१५ व वन डे क्रिकेटध्ये २७७ विकेट्स घेतल्या आहेत.  

१०० विकेट्स व १००० धावा करणारा शाकिब पहिला पुरुष क्रिकेटपटू असला तरी जगातला तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा एलिसे पेरी व पाकिस्तानचा निदा दार यांनी हा विक्रम केला आहे. पेरीनं १२४३ धावा व ११५ विकेट्स घेतल्या आहेत, तर दारच्या नावावर १२०७ धावा व १०३ विकेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त श्रीलंकेच्या लसिथ मलिंगानं १०० विकेट्स घेण्याचा पहिला मान पटकावला आहे. ( Shakib also became the second male cricket after Sri Lanka’s Lasith Malinga to pick up 100 T20I wickets.) 


  

Web Title: BAN vs AUS : Shakib Al Hasan becomes the third cricketer to achieve double of 1000 runs and 100 wickets in T20Is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.