Join us  

ना कॅच, ना बोल्ड; तरीही बांगलादेशचा फलंदाज OUT, ७२ वर्षानंतर कसोटीत विचित्र घडलं, Video 

न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत चांगले कमबॅक केलेले पाहयला मिळतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 1:14 PM

Open in App

BAN vs NZ 2nd Test : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी मागे सोडून बांगलादेशने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सामन्यात न्यूझीलंडवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. बांगलादेशने घरच्या मैदानावरील पहिल्या कसोटीत विजय मिळवून WTC च्या गुणतालिकेत भारताला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले. पण, न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत चांगले कमबॅक केलेले पाहयला मिळतेय आणि या सामन्यात बांगलादेशचा फलंदाज मुश्फीकर ( Mushfiqur Rahim) ज्या पद्धतीने बाद झाला त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. १९५१ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये अशी विकेट पडली आहे. 

मिरपूर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचे ६ फलंदा १२३ धावांत माघारी परतले. मिरपूर येथे खेळलेल्या एकूण २७ कसोटींपैकी ३ सामने ड्रॉ राहिले आहेत आणि यापैकी दोन सामने हे बांगलादेश-न्यूझीलंड यांच्यातले आहेत. महमुदुल हसन जॉय ( १४), झाकीर हसन ( ८), कर्णधार नजमूल शांतो ( ९), मोनिमुल हक ( ५) ही आघाडीची फळी किवी गोलंदाजांसमोर ढेपाळली. मुश्फीकर रहिम व शहादत होसैन यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु मुश्फीकरचा अतिउत्साह नडला.

मुश्फीरकने चेंडू बॅटने खेळला, परंतु त्यानंतर तो हाताने चेंडू अडवायला गेला आणि क्षेत्ररक्षणात अडथळा या नियमाखाली त्याला बाद दिले गेले. खरं तर त्याने हँडलिंग दी बॉल म्हणजेच चेंडू हाताने हाताळला होता, परंतु नव्या नियमानुसार ही कृती obstructing the field या श्रेणीत येते. अशा पद्धतीने बाद होणारा तो बांगलादेशचा पहिला फलंदाज ठरला, परंतु जगात दुसरा ठरला. यापूर्वी १९५१ मध्ये इंग्लंडच्या लिओनार्ड हटन यांनी ओव्हल मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कृती केली होती.  

टॅग्स :बांगलादेशन्यूझीलंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा