Join us  

BAN vs NZ: बांग्लादेशने मैदान मारलं; न्यूझीलंडला १५० धावांनी नमवत ऐतिहासिक विजय

न्यूझीलंकडून माजी कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 10:58 AM

Open in App

न्यूझीलंडचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत बांग्लादेशने ऐतिहासिक विजय मिळवला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांग्लादेशने १५० धावांनी दणदणीत विजय मिळवला. शेवटच्या दिवशी बांग्लादेशमध्ये संघाला तीन गडी बाद करणे गरजेचं होतं. गोलंदांनी अचूक मारा टाकत अवघ्या दीड तासात किवीच्या फलंदाजांना तंबूत धाडले. त्यामुळे, घरच्या मैदानावर न्यूझीलंडला नमवत बांग्लादेशने अफलातून विजयाची नोंद केली.  

न्यूझीलंकडून माजी कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते. पण तरी न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला अन् बांगलादेशने कसोटीवर पकड मजबूत केली. बांगलादेशने पहिल्या डावात ३१० धावा केल्या होत्या. बांग्लादेशचा पहिला डाव ३१० धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३१७ धावा केल्या. त्यानंतर, मैदानात उतरलेल्या बांग्लादेशने दुसऱ्या डावात ३३८ धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ अवघ्या १८१ धावांत तंबूत परतला. त्यामुळे, बांग्लादेशसाठी आजचा विजयी क्षण ऐतिहासिक ठरला. दुसऱ्या डावासाठी शेवटच्या दिवशी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या तीनही खेळाडूंना रोखण्यात बांग्लादेशला यश आलं अन् बांग्लादेश संघाची कसोटी पार झाली. 

डावखुरा तैजुल इस्लामच्या फिरकीपुढे फलंदाजांनी गुडघे टेकताच पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध यजमान बांग्लादेश विजयाच्या उंबरठ्यावर उभा होता. तैजुलने पहिल्या डावात चार आणि आता पुन्हा चार फलंदाजांना माघारी धाडले. विजयासाठी ३३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने दुसऱ्या डावांत ११३ धावांत ७ फलंदाज गमावले. त्यानंतर, शेवटच्या दिवशी तीन फलंदाजांनी अवघ्या दीड तासात पॅव्हेलियन गाठले अन् बांग्लादेशने विजय मिळवला.

अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला २१९ धावांची गरज होती. तत्पूर्वी, चौथ्या दिवशी अंधूक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला, त्यावेळी  डेरिल मिचेल ४४ आणि ईश सोढी ७ हे खेळपट्टीवर होते. मात्र, शेटवच्या दिवशी तिन्ही फलंदाज मिळून केवळ ६९ धावा काढू शकले. त्यामुळे, बांग्लादेशचा संघ १८१ धावांत तंबूत परतला. बांग्लादेशने १५० धावांनी मोठा विजय मिळवला.

दुसरा डाव

सलामीवीर डेवोन कॉन्वे २२, टॉम लॅथम ००, आणि पहिल्या डावातील शतकवीर केन विल्यमसन ११ धावा काढून परतला. हेन्री निकोल्स बाद होताच न्यूझीलंडची स्थिती ४ बाद ४६ झाली. यष्टिरक्षक टॉम ब्लंडेल ६, ग्लेन फिलिप्स आणि काइल जेमिसन हेदेखील पाठोपाठ बाद झाले. मिचेल- सोढी यांनी अर्धा तास तैजुलचा सामना केला. न्यूझीलंडने दुसऱ्या डावांत ११३ धावांत ७ फलंदाज गमावले होते. त्याआधी यजमान संघाने ३ बाद २१२ वरून खेळताना ३३८ पर्यंत मजल गाठली. शंटो १०५ धावांवर बाद होताच बांग्लादेशचे फलंदाज स्थिरावू शकले नाहीत.  मुशफिकूर रहीमने मात्र ७९ चेंडूत २७ वे कसोटी अर्धशतक साजरे केले.  शहादत हुसेन १८ धावा काढून परतला. अखेरचे तीन फलंदाज २७ धावांची भर घालून बाद झाले. 

टॅग्स :बांगलादेशन्यूझीलंड