Bangladesh vs Pakistan, 1T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर दाखल झाला आहे. पण, यजमान बांगलादेशनं पहिल्याच ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानला रडवलं. १२८ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करतानाही पाकिस्तानला अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करायला लागला. मोहम्मद रिझवान व बाबर आजम ही जोडी अपयशी ठरली. दोघांचाही त्रिफळा उडवला.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला ७ बाद १२७ धावा करता आल्या. अफिफ होसैन ( ३६), महेदी हसन ( ३०) व नुरूल हसन ( २८) यांनी संघासाठी संघर्ष केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅच सोडणारा हसन अली आजच्या सामन्यात चमकला. त्यानं २२ धावांत ३ व विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवान ( ११) व बाबर आजम ( ७) ही जबरदस्त जोडी २२ धावांवर माघारी परतली. हैदर अलीही ( ०) लगेच बाद झाला. २ बाद २३ अशी अवस्था असताना अनुभवी शोएब मलिककडून अपेक्षा होत्या. पण, तोही शाळकरी मुलगाही अशी चूक करणार नाही, तशी करून बाद झाला. पाकिस्तानचा निम्मा संघ ८० धावांवर माघारी परतला.
मुस्ताफिजूर रहमाननं टाकलेला चेंडू मलिकच्या बॅटला लागून यष्टिरक्षक नुरूल हसनकडे गेला. तोपर्यंत मलिकनं क्रिज सोडले होते. नुरूलनं त्याला रन आऊट करण्यासाठी चेंडू यष्टिंच्या दिशेनं फेकला, पण मलिक क्रिजवर बॅट टेकवायला विसरला अन् त्याला भोपळ्यावर धावबाद होऊन माघारी जावं लागलं. त्यानंतर खुशदील शाह व शादाब खान यांनी संघर्ष केला. पण, शोरीफुल इस्लामनं ही भागीदारी तोडताना खुशदीलला ३४ धावांवर बाद केले. १२ चेंडूंत १७ धावांची गरज असताना मोहम्मद नवाजनं दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. अखेरच्या षटकात शादाबनं षटकार खेचून पाकिस्तानचा विजय पक्का केला. पाकिस्ताननं हा सामना ४ विकेट्स व ४ चेंडू राखून जिंकला. शादाब २१ व नवाज १८ धावांवर नाबाद राहिला.
Web Title: BAN vs PAK : Pakistan win a thriller in Dhaka, PAK (132/6 in 19.2 ov) beat BAN (127/7) by 4 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.