बांगलादेश व पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. पाकिस्ताननं पहिल्या दिवशी २ बाद १८८ धावा केल्या होत्या. पावसामुळे पहिल्या दिवशी ६३ षटकांचाच खेळ झाला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटींग सुरूच राहिल्यानं खेळ होऊ शकला नाही. अशात पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये क्रिकेट खेळताना दिसले, तर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसननं थेट मैदानावर धाव घेत लहान मुलांसारखी पाण्यात उडी मारली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाकिस्ताननं या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीत अबीद अली व अबदुल्लाह शफिक यांनी पाकिस्तानला चांगली सुरूवात करून दिली. पण, तैजूल इस्लामनं दोघांनाही माघारी पाठलं. अली व शफिक यांनी अनुक्रमे ३९ व २५ धावा केल्या. त्यानंतर अझर अली व कर्णधार बाबर आजम यांनी वैयक्तिक अर्धशतकासह पाकिस्तानला पहिल्या दिवशी २ बाद १८८ धावांपर्यंत मजल मारून दिली. अली ५२ धावांवर, तर आजम ७१ धावांवर नाबाद आहे.
पाहा व्हिडीओ...
दरम्यान, पाकिस्तान संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( ICC world test championship) बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला होता. यजमान बांगलादेशनं विजयासाठी ठेवलेलं २०२ धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं ८ विकेट्स राखून सहज पार केले होते. बांगलादेशचा दुसरा डाव मात्र गडगडला. लिटन दास ( ५९) व यासीर अली ( ३६) वगळता बांगलादेशच्या फलंदाजांना अपयश आलं. शाहिन शाह आफ्रिदीनं ३२ धावांत ५ विकेट्स घेतल्या , तर साजीद खाननं तीन व हसन अलीनं दोन विकेट्स घेतल्या. बांगलादेशला दुसऱ्या डावात १५७ धावाच करता आल्या. बांगलादेशचं २०२ धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं सहज पार केलं. अबीद अलीनं ९१ आणि अब्दुल्लाह शफिकनं ७३ धावा केल्या.
Web Title: BAN vs PAK, Test : Shakib Al Hasan enjoying his time in Dhaka rain, Pakistan team also enjoyed a rain-affected day in Dhaka, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.