बांगलादेश व पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. पाकिस्ताननं पहिल्या दिवशी २ बाद १८८ धावा केल्या होत्या. पावसामुळे पहिल्या दिवशी ६३ षटकांचाच खेळ झाला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटींग सुरूच राहिल्यानं खेळ होऊ शकला नाही. अशात पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये क्रिकेट खेळताना दिसले, तर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसननं थेट मैदानावर धाव घेत लहान मुलांसारखी पाण्यात उडी मारली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाकिस्ताननं या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीत अबीद अली व अबदुल्लाह शफिक यांनी पाकिस्तानला चांगली सुरूवात करून दिली. पण, तैजूल इस्लामनं दोघांनाही माघारी पाठलं. अली व शफिक यांनी अनुक्रमे ३९ व २५ धावा केल्या. त्यानंतर अझर अली व कर्णधार बाबर आजम यांनी वैयक्तिक अर्धशतकासह पाकिस्तानला पहिल्या दिवशी २ बाद १८८ धावांपर्यंत मजल मारून दिली. अली ५२ धावांवर, तर आजम ७१ धावांवर नाबाद आहे.
पाहा व्हिडीओ...