नवी दिल्ली : राष्ट्रीय निवडकर्ते देवांग गांधी यांच्यासोबत कथितरीत्या गैरवर्तन केल्याच्या आरोपाबाबत बीसीसीआयने भारतीय संघाचे निलंबित फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची विचारपूस करण्याचा विचार नसल्याचे म्हटले आहे. मावळते व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम किंवा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अधिकृत अहवाल सादर केल्यानंतर त्यांना पाचारण करण्याचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले.
वेस्ट इंडिज दौऱ्यात हॉटेलमधील खोलीत देवांग गांधी आणि संजय बांगर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. बांगर यांची जागा सध्या विक्रम राठोड यांनी घेतली. बोर्डाच्या एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी बांगर यांनी ज्यांच्याशी हुज्जत घातली त्या देवांग गांधी यांची तक्रार आहे का, हे पाहावे लागेल. सहयोगी स्टाफच्या नियुक्तीची जबाबदारी राष्टÑीय निवड समितीकडे असते. सहयोगी स्टाफमधून केवळ बांगर यांना हटविण्यात आले. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर हे पदावर कायम आहेत. बांगर आणि गांधी यांच्यात बाचाबाची झाल्याच्या वृत्तास दुजोरा मिळाला आहे; पण बांगर सध्या करारबद्ध नसल्याने हे प्रकरण पुढे जाईल, असे वाटत नाही.’ अशी घटना झाल्याची माहिती रवी शास्त्री यांच्या अहवालात आहे काय, हे तपासावे लागेल. असे न झाल्यास हे प्रकरण सीओएकडे सोपविण्याचा प्रश्नच नाही. निलंबित झाल्यानंतर कुणाचीही निराशा स्वाभाविक असते. त्यांचा कार्यकाळ वाढविला जाईल, असा बांगर यांनी विचार करायला नको होता. बांगर यांची कामगिरी पाहून त्यांची उचलबांगडी झाली. बांगर यांनी गांधी यांना प्रश्न विचारायला नको होते. ’