ढाका : बांगला देशचा आगामी भारत दौरा होऊ नये यासाठी काहीजण आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बांगला देश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख (बीसीबी) नजमुल हसन यांनी केला. देशातील दिग्गज ११ खेळाडूंनी केलेल्या संपाला अशाच लोकांचाच पाठिंबा असल्याचेही त्यांचे मत आहे.
तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगला देश चार आठवड्यांच्या भारत दौऱ्यावर येत आहे. दौऱ्याआधी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय तसेच प्रथमश्रेणी सामन्यात वेतनवाढीच्या संप केला. बीसीबीने त्यांची मागणी मान्य करताच खेळाडूंनी संप मागे घेतला होता.
एका बंगाली वृत्तपत्राशी बोलताना हसन म्हणाले,‘मीडियाने भारत दौºयाबाबत अद्याप काहीही पाहिलेले नाही. प्रतीक्षा करा...,भारत दौºयात नुकसान होईल, असे कृत्य करा, अशी माझ्याकडे माहिती असेल आणि मी ती शेअर केली तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही असा विचार का करता, याबाबत सविस्तर सांगाल का, असा सवाल करताना हसन म्हणाले, ‘सिनियर खेळाडू तमीम इक्बाल याने पत्नीच्या बाळंतपणाचे कारण पुढे करीत दौºयातून माघार घेतली. आधी तो केवळ अखेरच्या कसोटीतून बाहेर राहणार होता. तमीमने आधी मला सांगितले की, दुसºया मुलाच्या जन्मामुळे कोलकाता येथे २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान दुसरी कसोटी खेळणार नाही. नंतर खेळाडूंसोबत बैठक होताच तमीम माझ्या खोलीत आला आणि म्हणाला की संपूर्ण दौºयातून मी बाहेर राहू इच्छितो. मी त्याला विचारले असे का? त्यावर तो केवळ इतकेच म्हणाला,‘मी भारत दौºयावर जाणार नाही.’ बांगला देश संघ दौºयासाठी ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीत दाखल होईल. तथापि याआधी आणखी काही खेळाडू दौºयातून माघार घेतील, अशी शंका बीसीबी अध्यक्षांनी उपस्थित केली. याबाबत ते म्हणाले, ‘अखेरच्या क्षणी आणखी काही खेळाडूंनी माघार घेतल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. त्यावेळी आमच्याकडे कुठलाही पर्याय राहणार नाही. मी शाकिबला चर्चेसाठी बोलविले होते. पण तो माघार घेऊ इच्छित असेल तर तडाकाफडकी कर्णधार कसा काय उभा करू शकतो? मला संघाचे संयोजन बदलावे लागू शकते.’ वरिष्ठ खेळाडूंनी घेतलेल्या पवित्र्यावर हसन यांनी आश्चर्य व्यक्त केले. खेळाडूंच्या मागण्यांवर सहमती दर्शवून आपण चूक केली, असा पश्चात्तापही अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
‘आता माझा विश्वास उडाला आहे. मी प्रत्येक दिवशी तमिमसोबत बोलत आहे. संप पुकारण्याआधी मला विश्वासात घेण्यात आले नाही. माझ्या मते त्यांच्या मागण्या मान्य करीत मी चूक करीत आहे. मी असे करायला नको होते. संप मागे घेणार नसाल तर मी तुमच्यासोबत चर्चा करू इच्छित नाही, असे म्हणायला हवे होते. बोर्डाच्या अनेक सदस्यांसोबत चर्चा करताना मी असे करायला नको होते याची जाणीव झाली, पण आमच्यावर मीडियाचेदेखील दडपण होते.’ - नजमुल हसन, अध्यक्ष बीसीबी
Web Title: Bangla BCB chief Nazmul Hasan charged
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.