Join us  

BAN vs NZ : बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी; थरारक सामन्यात न्यूझीलंडवर मिळवला विजय!

New Zealand tour of Bangladesh : बांगलादेश संघानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 7:23 PM

Open in App

New Zealand tour of Bangladesh : बांगलादेश संघानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडला अखेरच्या षटकात विजयासाठी २० धावांची गरज असताना टॉम लॅथम व कोल मॅकोनीए यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु अवघ्या ४ धावांनी किवींना हार मानावी लागली. पहिल्या ट्वेंटी-२०     किवींचा संपूर्ण संघ ६० धावांत माघारी परतला होता, पण आजच्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी कामगिरी उंचावली. मात्र, त्यांना विजय मिळवता आला नाही. बांगलादेशनं या विजयासह कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ८ ट्वेंटी-२० विजय मिळवण्याचा विक्रम केला. मागील दोन वर्षांत त्यांनी १३पैकी ११ ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत. ( Bangladesh have the highest win percentage (84.61) in Home T20Is in the last two years winning 11 out of 13 matches)

बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद नईम व लिटन दास यांनी दमदार सुरूवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ५९ धावा जोडल्या. नइम ३९ व दास ३३ धावांवर माघारी परतले अन् मधली फळी अपयशी ठरली. कर्णधार महमदुल्लाहनं नाबाद ३७ धावा करून संघाला ६ बाद १४१ धावांपर्यंत पोहोचवले. किवी गोलंदाज रचिन रविंद्र यांनं तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात कर्णधार टॉम लॅथम व विल यंग वगळता किवींच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. लॅथम ४९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ६५ धावा केल्या, तर  यंगने २२ धावा केल्या. किवींना ५ बाद १३७ धावा करता आल्या.  

टॅग्स :बांगलादेशटी-20 क्रिकेटन्यूझीलंड
Open in App