shakib al hasan ipl 2023 । नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे. मात्र, आयपीएलच्या सुरूवातीला कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) संघाला मोठा झटका बसला आहे. खरं तर नवनिर्वाचित कर्णधार नितीश राणाच्या नेतृत्वातील केकेआरला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्जच्या संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ७ धावांनी विजय मिळवत विजयी सलामी दिली. अशातच पहिल्या सामन्याला मुकलेल्या केकेआरच्या अष्टपैलू खेळाडूने आता यंदाच्या हंगामातून माघार घेतली आहे.
दरम्यान, बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन मागील अनेक वर्षांपासून केकेआरच्या संघाचा हिस्सा आहे. मात्र, त्याने आता आयपीएल २०२३ मधून माघार घेतल्याचे समजते. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, "शाकिब अल हसन आयपीएल २०२३ साठी उपलब्ध नसणार आहे. बांगलादेशच्या अष्टपैलू खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीला याबाबत कळवले असून त्याने आयपीएलच्या १६व्या हंगामातून माघार घेतली आहे." लक्षणीय बाब म्हणजे शाकिब अल हसनने माघार का घेतली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
सलामीच्या सामन्यात kkrचा पराभवआपल्या सलामीच्या सामन्यात केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला. दुखापतीमुळे संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलमधून बाहेर झाला आहे. अय्यरच्या गैरहजेरीत नितीश राणाच्या खांद्यावर संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पंजाबविरूद्धच्या सामन्यात केकेआरला काही खास कामगिरी करता आली नाही. यंदाच्या हंगामातील केकेआरचा दुसरा सामना गुरूवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा ipl 2023साठी संघ - नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, नारायण अरविंद, नारायण जगदीश, सुयश शर्मा, डेव्हिड वेईस, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, लिटन दास.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"