Join us

IND vs BAN: बांगलादेशने भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर केला तगडा संघ, कर्णधारपद कुणाला?

Bangladesh Test squad for India tour: पाकिस्तानला हरवणाऱ्या बांगलादेशी संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:13 IST

Open in App

Bangladesh Test squad for India tour, IND vs BAN: बांगलादेशने भारताविरुद्ध १९ सप्टेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी १६ खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. संघाचे नेतृत्व नझमुल हसन शांतोकडे असणार आहे. बांगलादेश संघाने नुकताच पाकिस्तानविरुद्ध २-० असा ऐतिहासिक कसोटी मालिका विजय नोंदवला. त्या दौऱ्यावर गेलेल्या सर्व खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे संघात फारसा बदल न करता संघ उतरवला आहे. वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम दुखापतग्रस्त झाला असल्याने त्याच्या जागी झाकेर अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेशच्या संघात कुणाकुणाचा समावेश?

पाकिस्तान दौऱ्याप्रमाणेच झाकीर हसन आणि शादमान इस्लाम भारताविरुद्ध ओपनिंग करतील. कर्णधार नजमुल शांतो बांगलादेशसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. संघात मोमिनुल हक, मुशफिकुर रहमान आणि महमुदुल हसन जॉय यांचा फलंदाज म्हणून समावेश आहे, तर लिटन दास यष्टीरक्षण करताना दिसेल. शरीफुल इस्लामच्या जागी आलेला झाकेर अली संघाचा पर्यायी यष्टीरक्षक फलंदाज असेल.

शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज हे अनुभवी फिरकी अष्टपैलू म्हणून राहतील. तस्किन अहमद, हसन महमूद, खालिद अहमद आणि नाहिद राणा हे संघाचे चार प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. याशिवाय नईम हसन आणि तैजुल इस्लाम हे आणखी दोन फिरकीपटूही संघात आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशबांगलादेशभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघपाकिस्तान