मुंबई : भारताचा दक्षिण आफ्रिकेबरोबर तिसरा सामना होणार आहे. भारताचीबांगलादेशबरोबर ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच बांगलादेशने भारताला हरवलं, असा एक ट्रेंड सुरु झाला आहे. हा ट्रेंड नेमका काय आहे आणि यामागचे वायरल सत्य आहे तरी काय... ते जाणून घेऊया.
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये फुटबॉलचे दोन सामने खेळवण्यात आले. त्यामध्ये तरी बांगलादेशने भारताला पराभूत केले का, हे पाहिले गेले. पण या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. त्यामुळे बांगलादेशने या लढतींमध्येही भारतावर विजय मिळवला नाही. मग नक्कीच बांगलादेशचा भारतावर विजय, हे ट्रेंडिंगमध्ये आलं तरी कसं...
स्टार स्पोर्ट्सने सध्या एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेबाबत आहे. या व्हिडीओनंतर आता बांगलादेशने भारताला पराभूत केले, हा ट्रेंड सुरु झाला आहे. पण नेमके हे आहे तरी काय...
या व्हिडीओमध्ये भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि एक कार्टुन दाखवण्यात आले आहे. सेहवाग भारताचे आणि ते कार्टुन बांगलादेशचे प्रतिनिधीत्व करत आहे. या व्हिडीमध्ये एक गेम खेळला जातो. हा गेम चिमणी उड, कावळा उड... या प्रकारचा आहे. या खेळात त्या काट्रुनने विराट कोहली उड, असे म्हटले आणि सेहवागने आपले बोट उचलल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर हा ट्रेंड सुरु झाल्याचे म्हटले गेले आहे.