मिरपूर, दि. 30 - आपल्या दमदार फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना जेरीस आणणारे मॅट रेनशॉ, उस्मान ख्वाजा आणि स्टिव्ह स्मिथ सारखा चिवट फलंदाजी करणारा कर्णधार डावात असतानाही बलाढ्य ऑस्ट्रेलिया बांगलादेशच्या फिरकीपटूंनी इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पहिला विजय मिळवला. विशेष म्हणजे एका बाजुने डेव्हिड वॉर्नरसारखा धडाकेबाज फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजाना दणक्यात टोलवत होता आणि दुसºया बाजूने एकापाठोपाठ एक सगळेच तंबूत परतत होते अशी केविलवाणी स्थिती ऑस्ट्रेलियाची झाली होती.
बांगलादेश तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियासारख्या संघासमोर लिंबू टिंबूसारखीच. पण पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत याच लिंबू टिंबूने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. यात महत्त्वाची भूमिका अर्थातच गोलंदाजांची निभावली. शाकिब अल हसन आणि तैजूल इस्लाम यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा निभाव लागला नाही. चौथ्या दिवशी विजय मिळवता मिळवता 20 धावांनी टीम ऑस्ट्रेलिया ढेर झाली. डेव्हिड वॉर्नरने तडकावलेले शतक तेवढे ऑस्ट्रेलियाची लाज राखून गेले.
बांगलादेशने ऑस्ट्रेलियासमोर 265 धांवाचे माफक आव्हान ठेवले होते. शिवाय अखेरचे दोन-अडीच दिवसही ऑस्ट्रेलियाच्या हाती होते. पण, एवढी धावसंख्याही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पार करता आली नाही. ऑस्ट्रेलियाने तिसºयाच्या दिवसाच्या अखेरच्या सत्रापासून अखेरच्या डावाला सुरुवात केली. तिसºया दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावत 102 धावांपर्यंत मजल मारली होती. रेनशॉ आणि ख्वाजा हे दोघे स्वस्तात बाद झाले होते. आता केवळ 163 धावांचा टप्पा गाठायचा होता. दोन दिवस हाती होते. मैदानावर डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथसारखे दिग्गल फलंदाज खिंड लढवत होते. चौथ्या दिवसाची सुरुवात चांगली करून ऑस्ट्रेलियाने विजयाकडे कूच केले. ड्रिक्ससाठी डाव थांबला त्यावेळी दमदार शतक ठोकून डेव्हिड वॉर्नर तंबूत परतला होता. शाकीब अल हसनचा थोडा खाली राहिलेल्या चेंडूवर वॉर्नर चुकला. त्याच्या पायाला चेंडू लागला आणि त्याला अम्पायरने पायचित दिले. त्यानंतर स्मिथ आणि हँड्सकॉम्ब यांनी डाव सावरायला सुरुवात केली होती. त्यांनर बांगलादेशच्या फिरकीची जादू चालायला सुरुवात झाली आणि एक-एक करत सगळेच पव्हेलियनचा रस्ता धरायला लागले.
स्टिवन स्मिथ 37 धावा काढून परत गेला. तैजूल पीटर हँड्सकॉम्ब 15, अॅश्टन एगर 02 धावा काढून आऊट झाले. मॅथू वेडही 4 धावांवर बाद झाला. डाव लंचसाठी थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 195 धावांवर 7 बाद अशी होती. मात्र त्यानंतर सामना सुरू होताच पहिल्याच चेंडूवर शाकीबने ग्लेन मॅक्सवेलची विकेट काढली. त्यांनर नॅथन लिओनही तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाच्या हाती केवळ एक विकेट होती आणि धावा काढायच्या होत्या 37. आदल्या दिवशी पराभवाच्या छायेत असणारा बांगला देश आता विजयाच्या उंबरठ्यावर होता. कमिन्सने मेहदी हसनला दोन षटकार खेचले आणि सामन्यात रंगत आली. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने पारडे झुकते की काय अशी शंका येऊ लागली होती. परंतु तैजूलने अचानक हेजलवूडची विकेट काढली. ऑस्ट्रेलिया 244 धावांवर तंबूत परतली. अन् बांगला देशने इतिहास रचला.
ऑस्ट्रेलियासाठी हे तिघे ठरले कर्दनकाळपहिल्या डावात 68 धावा देऊन पाच गडी बाद करणाºया शाकीबने दुसºया डावात 85 धावा देऊन अर्धा ऑस्ट्रेलिया संघ तंबूत धाडला. तैजूलने 60 धावा देत तीन गडी बाद केले तर ऑफ स्पिनर मेहदी हसन मिराजने 80 धावा देत दोन विकेट काढल्या. या तिघांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरोधात आतापर्यंत झालेल्या पाच कसोटी सामन्यांतील पहिला विजय मिळवला आहे.