Join us  

IND vs BAN: भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठा झटका; कर्णधारच झाला संघाबाहेर 

4 डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 7:11 PM

Open in App

नवी दिल्ली : 4 डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ बांगलादेशच्या धरतीवर वनडे आणि कसोटी मालिका खेळेल. आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शाकिब अल हसनचे बांगलादेशच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेशच्या संघाची कमान तमीम इक्बालच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. मात्र मालिका तोंडावर असतानाच यजमान संघाला मोठा झटका बसला आहे. कारण बांगलादेशच्या वनडे संघाचा कर्णधार तमाम इक्बाल संघाबाहेर झाला आहे. 

कर्णधारच झाला संघाबाहेर दरम्यान, वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदनंतर कर्णधार तमीम इक्बालही या मालिकेतून बाहेर पडल्यामुळे बांगलादेशच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर 30 नोव्हेंबरला सराव सामन्यादरम्यान तमीमला दुखापत झाली होती त्यामुळे आता त्याला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. वनडे मालिका 10 डिसेंबरला संपत आहे आणि पहिली कसोटीही 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे, अशा परिस्थितीत तमीमला पहिल्या कसोटीत खेळणार का याबाबत देखील संभ्रम आहे.

गुरुवारी क्रिकबझशी बोलताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ते मिन्हाजुल आबेदीन म्हणाले, "तस्कीनला पाठदुखीचा त्रास होत असल्याने वनडे सामन्यांच्या सुरुवातीच्या त्याला संघातून वगळण्यात आले आहे. तो कसोटी मालिकेत खेळणार का याबाबत त्याच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल."

बांगलादेशचा वनडे संघ - लिटन दास, अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो, महमुदुल्लाह, नुरूल हसन, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला. 

बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल. 

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक 

  • 1 डिसेंबर - भारतीय संघ बांगलादेशला पोहचेल
  • 4 डिसेंबर - पहिला वनडे सामना, ढाका
  • 7 डिसेंबर - दुसरा वनडे सामना, ढाका
  • 10 डिसेंबर - तिसरा वनडे सामना, ढाका
  • 14-18 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
  • 22-26 डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका
  • 27 डिसेंबर - भारतीय संघ मायदेशी परतण्यासाठी रवाना होईल  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशबांगलादेशरोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुल
Open in App