BAN vs ENG: बांगलादेशनं रचला इतिहास! 3-0 ने विजय मिळवून 'विश्वविजेत्या' इंग्लंडला केलं चीतपट

bangladesh vs england: बांगलादेशच्या संघाने बलाढ्य इंग्लंडला ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 ने पराभूत करून इतिहास रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 06:24 PM2023-03-14T18:24:28+5:302023-03-14T18:25:33+5:30

whatsapp join usJoin us
Bangladesh created history after  white-washed World Champions England 3-0 in T20   | BAN vs ENG: बांगलादेशनं रचला इतिहास! 3-0 ने विजय मिळवून 'विश्वविजेत्या' इंग्लंडला केलं चीतपट

BAN vs ENG: बांगलादेशनं रचला इतिहास! 3-0 ने विजय मिळवून 'विश्वविजेत्या' इंग्लंडला केलं चीतपट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

bangladesh vs england 3rd T20 । ढाका : बांगलादेशच्या संघाने बलाढ्य इंग्लंडला ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 ने पराभूत करून इतिहास रचला आहे. आज झालेल्या अखेरच्या सामन्यात 16 धावांनी विजय मिळवून बांगलादेशने विश्वविजेत्या इंग्लंडला व्हाईटवॉश दिला. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान बांगलादेशने 20 षटकांत 2 बाद 158 धावा केल्या. लिटन दास (73) आणि नजमूल शांतो (47) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर बांगलादेशने इंग्लिश संघासमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले. 

159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने शानदार सुरूवात केली. मात्र, अस्तित्वाची लढाई जिंकण्यात त्यांना अपयश आले आणि बांगलादेशने इतिहास रचला. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली, तर जोस बटलर 40 धावा करून तंबूत परतला. तस्कीन अहमदने 2 बळी घेत इंग्लिश संघाला मोठे धक्के दिले. याशिवाय मुस्ताफिजुर रहमान आणि तन्वीर इस्लाम यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. 20 षटकांत इंग्लंडचा संघ 6 बाद केवळ 142 धावा करू शकला आणि बांगलादेशने 16 धावांनी विजय मिळवला.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर बांगलादेशची कामगिरी - 

  • 3-0 ने इंग्लंडविरूद्ध विजयी 
  • 4-1 ने ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजयी 
  •  3-2 ने न्यूझीलंडविरूद्ध विजयी 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Bangladesh created history after  white-washed World Champions England 3-0 in T20  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.