आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या लग्नाचा चोरट्यांनी हातसफाई करताना पाहुण्यांचे मोबाईल, पॉकेट चोरले. ते इथवरच थांबले नाही तर त्या क्रिकेटपटूच्या नातेवाईकांनाही त्यांनी मारहाण केली. क्रिकेटपटूच्या लग्नात असं काही घडेल, याची कल्पनाही कोणी केली नसावी. पण, लग्नसोहळ्यातील हा ट्विस्ट इथेच संपत नाही. इथे चोरांना सोडा आता तर त्या क्रिकेटपटूलाच जेलमध्ये जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेही एक-दोन दिवसांसाठी नाही, तर ३ वर्षांसाठी त्याला कारावास होण्याची शक्यता आहे. लग्नात त्यानं केलेली एक चूक महागात पडण्याचे चिन्ह दिसत आहेत.
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू सौम्या सरकार नुकताच विवाहबद्ध झाला. सौम्या सरकारने खुलना येथील रहिवासी प्रियोन्ती देबनाथ हिच्याशी विवाह केला. सौम्या आणि प्रियोन्तीच्या शाही विवाह सोहळ्यात क्रिकेटपटूंसोबत अनेक व्हीआयपी मंडळी सहभागी झाली होती. मात्र याच विवाह सोहळ्यात काही चोरटेही घुसले होते. त्यांनी काही वऱ्हाडी मंडळींच्या मोबाईलवर हात साफ केला. त्यानंतर या चोरांनी सौम्या सरकारच्या एका नातेवाईकाला मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सौम्या सरकारने विवाहासाठी काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. त्याची पत्नी प्रियोन्ती हिने ढाका येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून ओ स्तराची परीक्षा पास केली आहे. विवाहामुळे सौम्या सरकार झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सहभागी झाला नव्हता. सौम्या सरकराने आतापर्यंत १५ कसोटी, ५५ एकदिवसीय आणि ४८ टी-२० ,सामन्यात बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे.
सौम्याकडून झाली चूक...या शाही विवाह सोहळ्यात सौम्यानं हरणाचं कातडं वापरलं होतं. त्यामुळे त्याला तीन वर्षांचा कारावास होऊ शकतो. बांगलादेशमध्ये हरणाचं कातडं वापरण्यावर बंदी आहे. त्यामुळे जर सौम्या दोषी आढळला, तर त्याच्यासमोरील अडचणी वाढू शकतात. यावर सौम्याचे वडील किशोरी मोहन सरकार यांनी सांगितले की, हरणाचं कातडं वापरणे ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे आणि ते कातडं फार जुनं आहे. ते एका पिढीपासून पुढील पिढीपर्यंत वापरले जात आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई; पाहा त्याच्या देशी साखरपुड्याचे फोटो!
सीएएचा विरोध करणे मांजरेकरला पडले महागात, बीसीसीआय समालोचन पॅनलमधून बाहेरचा रस्ता